ग्राहकांच्या पसंतीस उतरली नवीन Maruti Swift; दहा दिवसांत मिळाल्या 10 हजार बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 08:06 PM2024-05-13T20:06:40+5:302024-05-13T20:06:56+5:30

New Gen Maruti Suzuki Swift : ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आली आहे. यात 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फिचर्स मिळतात.

New Gen Maruti Suzuki Swift : new Maruti Swift has become a favorite of customers; 10 thousand bookings received in ten days | ग्राहकांच्या पसंतीस उतरली नवीन Maruti Swift; दहा दिवसांत मिळाल्या 10 हजार बुकिंग

ग्राहकांच्या पसंतीस उतरली नवीन Maruti Swift; दहा दिवसांत मिळाल्या 10 हजार बुकिंग

New Gen Maruti Suzuki Swift : देशातील आघाडीची ऑटोमोबाईळ कंपनी Maruti Suzuki ने काही दिवसांपूर्वीच न्यू जनरेशनची  Swift भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. कंपनीने या कारची किंमत एक्स-शोरुम 6.49 लाख ते 9.65 लाख रुपये दरम्यान ठेवली आहे. या मॉडेलमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल, फिचर अपग्रेड आणि ऑल-न्यू Z सिरीज इंजिन मिळेल. विशेष म्हणजे, या कारचे बुकिंग 1 मे पासून सुरू झाले होते. बुकिंग विंडो उघडल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत या कारसाठी 10,000 बुकिंग प्राप्त झाल्या आहेत.

व्हेरिएंट, इंजिन अन् मायलेज
नवीन स्विफ्ट लाइनअपमध्ये पाच प्रकार LXi, VXi, VXi (O), ZXi आणि ZXi+ मिळेल. या सर्व प्रकारात नवीन 1.2 L, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन असेल. कंपनीच्या दाव्यानुसार, कारचे इंजिन मॅन्युअल ट्रांसमिशनसह 24.8kmpl आणि AMT गिअरबॉक्ससह 25.72kmpl मायलेज देईल. जुन्या K12 पेट्रोल इंजिनच्या तुलनेत नवीन Z-सिरीज इंजिन 3kmpl जास्त मायलेज देईल. तसेच, हे इंजिन 82bhp पॉवर आणि 112Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारचा बाहेर आणि आतील भाग
कारचे ओव्हरऑल डिझाइन आणि इंटीरिअर आधीसारखेच आहे, पण आता ही पूर्वीपेक्षा अधिक शार्प झाली आहे. कंपनीने यात नवीन बंपर आणि नवीन डिझाइन केलेले रेडिएटर ग्रिल दिले आहेत. याशिवाय, ब्रँडचा लोगो जो आधी ग्रिलवर असायचा, तो आता कारच्या बोनेटवर लावण्यात आला आहे. नवीन हेडलॅम्प आणि फॉग-लॅम्प कारला पूर्णपणे फ्रेश लुक देतात. 

कारच्या इंटिरिअरला स्मार्ट लुक देण्यात आला आहे. याचे केबिन फ्रॉन्क्ससारखेच आहे. यात फ्री-स्टँडिंग इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन स्टाइल सेंटर एअर-कॉन व्हेंट्स देण्यात आले आहेत. ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आली आहे. याच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग मिळतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलदेखील मिळतो.

Web Title: New Gen Maruti Suzuki Swift : new Maruti Swift has become a favorite of customers; 10 thousand bookings received in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.