न्यू जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे डिटेल्स आले समोर, लवकरच लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:24 PM2023-08-24T17:24:40+5:302023-08-24T17:25:12+5:30

30 ऑगस्ट 2023 रोजी लाँच होणार आहे.

New Generation Royal Enfield Bullet 350 Brochure Leaked - Variants, Features, Colours | न्यू जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे डिटेल्स आले समोर, लवकरच लाँच होणार

न्यू जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे डिटेल्स आले समोर, लवकरच लाँच होणार

googlenewsNext

नवी दिल्ली : न्यू जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची (New Generation Royal Enfield Bullet 350) अनेक दिवसांपासून भारतीयांची प्रतीक्षा आहे. जी 30 ऑगस्ट 2023 रोजी लाँच होणार आहे. कंपनीने अद्याप बुलेटचे व्हेरिएंट आणि फीचर्सचा खुलासा केलेला नाही. मात्र, मोटारसायकलच्या लीक माहितीपुस्तिकेच्या आधारे त्याबाबतचे सर्व डिटेल्स समोर आले आहे.

इंजिन डिटेल्स
लीक झालेल्या माहितीनुसार, नवीन 2023 रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मध्ये नवीन 350cc J-सीरीज इंजिन वापरण्यात येणार आहे. जे 6100rpm वर 20.2bhp पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन कंपनीच्या इतर  350cc मॉडेल्ससारखेच आहे. रॉयल एनफिल्डचे नवीन जे-सिरीज इंजिन आपला कमी आवाज आणि व्हायब्रेशन लेव्हलसह अधिक एफिशिएंट व्हॉल्व्ह टायमिंगसाठी लोकप्रिय आहे. हे एक युनिक साउंड असलेले लांब स्ट्रोक इंजिन म्हणून ओळखले जाते. यात नवीन 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

ब्रेक आणि टायर्स
नवीन बुलेट 350 च्या सस्पेंशन सेटअपमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन गॅस-चार्ज्ड रिअर शॉक मिळतील. तसेच, सिंगल डिस्क ब्रेक ड्युअल-चॅनल ABS सह फ्रंट आणि रिअर दोन्ही एक्सलवर देखील मिळणार आहे. यात समोरील बाजूस रुंद 100-सेक्शन टायर आणि मागील बाजूस 120-सेक्शन टायर मिळतील. 

स्पेसफिकेशन 
लीक झालेल्या ब्रोशरमध्ये असे दिसून आले आहे की, 2023 रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ला नवीन ग्रॅब रेलसह 805 मिमी उंच सिंगल सीट मिळेल. मोटारसायकलला डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळेल, ज्यामध्ये यूएसबी पोर्टसह एलसीटी इन्फॉर्मेशन पॅनेल आणि चांगल्या एर्गोनॉमिक्ससाठी पुन्हा डिझाइन केलेले हँडलबार समाविष्ट असणार आहे. 

व्हेरिएंट आणि कलर ऑप्शन
नवीन बुलेट लाइनअप तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मिलिट्री व्हेरिएंट रेड आणि ब्लॅक, स्टँडर्ड व्हेरिएंट ब्लॅक आणि मरून व  ब्लॅक गोल्ड कलरमध्ये असणार आहे. बेस मिलिटरी व्हेरिएंटमध्ये डार्क कलर टँक, डिकल्ससह ग्राफिक्स, ब्लॅक एलिमेंट्स, क्रोम इंजिन आणि रिअर ड्रम ब्रेकसह सिंगल-चॅनल एबीएस मिळेल. मिड-रेंज स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये क्रोम आणि गोल्ड 3डी बॅजिंग, गोल्ड पिनस्ट्रिपिंग, क्रोम इंजिन आणि मिरर्स, बॉडी-कलर्ड कंपोनेंट्स आणि टँक, ड्युअल-चॅनल ABS आणि रिअर डिस्क ब्रेक यांसारखी फीचर्स आहेत.

Web Title: New Generation Royal Enfield Bullet 350 Brochure Leaked - Variants, Features, Colours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.