Honda Activa Premium Edition मध्ये गोल्डन थीमचा तडका; सर्वातआधी इथं जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:33 AM2022-08-18T11:33:22+5:302022-08-18T11:34:32+5:30

Honda कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून Activa च्या नवीन मॉडेलचे टिझर जारी केले जात आहेत. ज्यात नव्या Activa ची झलक पाहायला मिळत होती.

new honda activa premium edition deluxe in india price 75400 rupees with 3d golden colors | Honda Activa Premium Edition मध्ये गोल्डन थीमचा तडका; सर्वातआधी इथं जाणून घ्या किंमत...

Honda Activa Premium Edition मध्ये गोल्डन थीमचा तडका; सर्वातआधी इथं जाणून घ्या किंमत...

googlenewsNext

Honda कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून Activa च्या नवीन मॉडेलचे टिझर जारी केले जात आहेत. ज्यात नव्या Activa ची झलक पाहायला मिळत होती. पण अ‍ॅक्टिव्हाच्या नव्या मॉडेलवरून अखेर पडदा उठला आहे. नवीन Activa चं नाव Honda Activa Premium Edition असं आहे. नवीन अ‍ॅक्टिव्हा नवीन रंग आणि डिझाइनसह सादर करण्यात आली आहे. इंजिनची वैशिष्ट्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच राहतील. नवीन अ‍ॅक्टिव्हाचे वेगवेगळे भाग सोनेरी रंगात दिसणार आहेत. कंपनीने Activa Premium Edition Deluxe मॉडेलच्या किमतीही आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत ७५,४०० रुपये आहे.

गोल्डन रंगाचा तडका
Honda Activa Premium Edition मध्ये सोनेरी रंगाचा भरपूर वापर करण्यात आला आहे. या सोनेरी रंगात नव्या अ‍ॅक्टिव्हाची नवी ओळख बनण्याची क्षमता आहे. कारण सोनेरी रंग आगामी स्कूटरच्या अनेक भागांना वेगळा लूक देत आहे. नवीन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या चाकांचा रंगही सोनेरी आहे. याशिवाय अ‍ॅक्टिव्हा प्रीमियमचा फ्रंट लूक आणि समोर होंडाचे नावही सोनेरी रंगाचे देण्यात आले आहे. लेटेस्ट स्कूटरची आतील बॉडी आणि सीट कव्हर देखील सोनेरी आहे. 

Activa प्रीमियमचे फीचर्स
Activa चे नवीन मॉडेल अनेक नव्या फीचर्ससह सादर करण्यात आलं आहे. प्रीमियम आवृत्तीत इंधन भरण्यासाठी कॅप बाहेर उपलब्ध असेल. नवीन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरमध्ये अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर-सीट स्टोरेज, एलईडी हेडलॅम्प आणि ईएसपी तंत्रज्ञान यांसारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. अ‍ॅक्टिव्हा प्रीमियमच्या इंजिनला फ्युएल इंजेक्शन देण्यात आले आहे.

इंजिन आणि रंगाचे पर्याय
Activa Premium Edition चे इंजिन सध्याच्या मॉडेलप्रमाणेच आहे. कंपनीनं इंजिनमध्ये कोणतेही मोठे अपग्रेड केलेले नाही. नवीन अ‍ॅक्टिव्हामध्ये 109.51 सीसीचे इंजिनही उपलब्ध आहे. Honda ने Activa चे नवीन मॉडेल तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केलं आहे. यामध्ये ग्राहकांना मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक, मॅट रेड मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू कलर पर्याय मिळतात.

Web Title: new honda activa premium edition deluxe in india price 75400 rupees with 3d golden colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.