आता ह्युंदाई क्रेटाचं काय होणार? टक्कर देण्यासाठी आली नवी Kia Seltos Facelift, खास आहेत फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:17 PM2023-07-04T21:17:40+5:302023-07-04T21:18:18+5:30

यात फ्रंटला नवे आणि अत्यंत आकर्षक डिझाइनही मिळते. येथे नवा एलईडी डे-टाइम रनिंग लॅम्प, नवी ग्रिल, नवे बम्पर आणि नवी स्किड प्लेटही देण्यात आली आहे.

new kia seltos facelift launch know about specifications | आता ह्युंदाई क्रेटाचं काय होणार? टक्कर देण्यासाठी आली नवी Kia Seltos Facelift, खास आहेत फीचर्स

आता ह्युंदाई क्रेटाचं काय होणार? टक्कर देण्यासाठी आली नवी Kia Seltos Facelift, खास आहेत फीचर्स

googlenewsNext

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाई क्रेटाचा मोठा दबदबा आहे. मात्र आता तिला टक्कर देण्यासाठी बाजारात आता नवी अपडेटेड किआ सेल्टॉस आली आहे. किआने आपल्या सेल्टॉसचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर केले आहे. 2023 किआ सेल्टोसच्या एक्सटीरिअर आणि इंटीरिअरमध्ये काही बदल करण्यात आले असून काही नवे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. यात फ्रंटला नवे आणि अत्यंत आकर्षक डिझाइनही मिळते. येथे नवा एलईडी डे-टाइम रनिंग लॅम्प, नवी ग्रिल, नवे बम्पर आणि नवी स्किड प्लेटही देण्यात आली आहे.

या एसयूव्हीच्या नव्या मॉडेलला तीन इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. याचे 1.5L नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल 115bhp/144Nm जनरेट करेल आणि 1.5L डिझेल इंजिन 115bhp/253Nm जनरेट करेल. हे दोन्ही इंजिन ऑप्शन्स या पूर्वीच्या मॉडेलसोबतही येत होते. मात्र, आता यासोबतच एक तिसरे इंजिन ऑप्शनही देण्यात आले आहे. हे 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 160bhp आणि 253Nm जेनरेट करते. या कारसोबत 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक, 6-स्पीड iMT, IVT आणि 7-स्पीड डुअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचे ऑप्शनही येते.

या कारला लेव्हल 2 ADAS देण्यात आले आहे. यात फ्रंट कोलिजन वॉर्निंग, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, फ्रंट कोलिजन असिस्‍टन्स, स्टॉप अँड गोसोबतच स्मार्ट क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन वॉर्निंग, रिअर क्रॉस-ट्रॅफिक कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन किपिंग असिस्ट, सेफ एक्जिट वॉर्निंग, लेन फॉलोइंग असिस्ट, लिडिंग व्‍हिकल डिपार्चर अलर्ट आणि हाय बीम असिस्ट सारखे 17 फिचर्स आहेत. याशिवाय, या कारमध्ये 15 स्‍टँडर्ड सेफ्टी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत.

इंटिरिअर हायलाइट्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, डुअल पॅन पॅनोरमिक सनरूफ, न्‍यू सेंटर फेसिया, डुअल स्क्रीन पॅनोरमिक डिस्प्ले, नवे सीट डिझाइन (लेदर/फेब्रिक), ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, स्मार्ट 20.32 सेमी (8.0") हेड-अप डिस्प्ले, 8 स्पीकरसह बोस प्रीमियम साउंड सिस्टिम, 8-वे पॉवर ड्रायव्हर सीटसह फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर असलेला 360 डिग्री कॅमेरा, डी-कट स्टिअरिंग व्हील, एलईडी साउंड मूड लाइट्ससह एम्बिएंट मूड लाइटिंग मिळते.
 

Web Title: new kia seltos facelift launch know about specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.