महिंद्रा Thar चे नवीन Earth Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 08:26 PM2024-02-27T20:26:11+5:302024-02-27T20:27:11+5:30
New Mahindra Thar Launched: भारतात महिंद्राच्या THAR ला प्रचंड मागणी आहे. यामुळेच आता कंपनीने याचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे.
Mahindra Thar चे भारतात प्रचंड चाहते आहेत. खासकरुन तरुण वर्गात या SUV ला खुप मागणी असते. तुम्हालाही ही एसयूव्ही खरेदी करायची असेल, तर आता तुम्ही थारचे नवीन मॉडेल घेऊ शकता. महिंद्रा अँड महिंद्राने थारे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. 'महिंद्रा थार अर्थ एडिशन' असे या नवीन मॉडेलला नाव देण्यात आले आहे. ही नवीन SUV एकूण चार प्रकारांमध्ये मिळाल, ज्यात पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल ऑटोमॅटिक, डिझेल मॅन्युअल आणि डिझेल ऑटोमॅटिकचा समावेश आहे.
स्टायलिंग
स्टाईलबद्दल बोलायचे झाले तर नवीन महिंद्रा थार मॅट फिनिश डेजर्ट कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. एसयूव्हीमध्ये मॅट ब्लॅक बॅजसह सिल्व्हर फिनिश अलॉय व्हील आहेत. कारमध्ये एराथ एडिशन बॅजिंग देण्यात आले आहे. इंटिरिअरमध्ये ड्युअल टोन कलर स्कीमदेखील मिळेल. तसेच, दारावर थार ब्रँडिंग देण्यात आले आहे. केबिनमध्ये डार्क क्रोम फिनिशिंग मिळेल.
From the depths of the desert, an icon is born. Witness the Mahindra Thar Earth Edition, a Thar like no other.#MahindraTharSpecialEdition#MahindraThar#EarthEdition#DesertFury#AllNewTharpic.twitter.com/abX6id7Jz8
— Mahindra Thar (@Mahindra_Thar) February 27, 2024
महिंद्रा थार अर्थ एडिशन इंजिन
सध्याच्या मॉडेल्सप्रमाणेच थारच्या स्पेशल एडिशनमध्येही दोन इंजिनांचा पर्याय आहे. यापैकी एक 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, तर दुसरे 2.2 लीटर डिझेल इंजिन आहे. इंजिन सेटअपसह 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. याशिवाय थारसोबत अनेक ॲक्सेसरीजही घेता येतात.
नवीन महिंद्र थारची किंमत
महिंद्रा थार अर्थ एडिशन 15.40 लाख (एक्स-शोरुम) रुपयांपासून सुरू होते. पेट्रोल मॅन्युअलची किंमत 15.40 लाख रुपये, एक्स-शोरूम आहे. तसेच, पेट्रोल ऑटोमॅटिकची किंमत 16.99 लाख रुपये, डिझेल मॅन्युअलची किंमत 16.15 लाख रुपये आणि डिझेल ऑटोमॅटिकची किंमत 17.60 लाख रुपये, एक्स-शोरूम आहे.