Brezza-Nexon ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Mahindra एसयूव्ही, फक्त 5.5 सेकेंदांत घेणार 100kmph ची स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:07 PM2022-08-23T17:07:08+5:302022-08-23T17:07:55+5:30
माध्यमांतील वृत्तांनुसार, या एसयूव्हीचे अपडेटेड व्हर्जन एवढे पॉवरफुल असेल, की ते केवळ 5.5 सेकेंदातच शून्यापासून 100 kmph एवझा वेग घेईल.
महिंद्रा सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेन्टमध्ये आपली पॉप्युलर कार Mahindra XUV300 ची विक्री करते. हिची स्पर्धा टाटा नेक्सॉन आणि मारुती सुझुकी ब्रेझा सारख्या गाड्यांसोबत असते. आता कंपनी आपल्या या एसयूव्हीला नव्या अवतारात आणत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, महिंद्रा आपल्या एक्सयूव्ही 300 ला फेसलिफ्ट अवतारात लॉन्च करत आहे. नुकतेच नवी XUV300 Facelift चे काही फोटोज समोर आले आहेत. कंपनीने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमाने या नव्या फेसलिफ्ट व्हर्जनचा टीझर दाखवला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, या एसयूव्हीचे अपडेटेड व्हर्जन एवढे पॉवरफुल असेल, की ते केवळ 5.5 सेकेंदातच शून्यापासून 100 kmph एवझा वेग घेईल. ही कार टीझरमध्ये रेड कलरमध्ये दिसून येत आहे. याच बरोबर या कारला नवा लोगोही मिळाला आहे. सनासुदीच्या काळात ही कार लॉन्च होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महिंद्राचा हा नवा लोगो फ्रंट शिवाय, स्टेअरिंग व्हील आणि मागच्या बाजूसही देण्यात आला आहे.
या कारमध्ये 1.2 mStallion टर्बो पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. जे सध्याच्या इंजिनच्या तुलनेत 20hp अधिक पॉवर आणि 30Nm अधिक टॉर्क जनरेट करेल. ही कार एकूण 130hp एवढी पॉवर आणि 230Nm एवढा टॉर्क जनरेट करेल. या कारचे एक डुअल टोन कलर ऑप्शनदेखील टेस्टिंग दरम्यान दिसून आले आहे. यात ब्लू पेंट स्कीमसोबतच व्हाइट कलरचे रूफ देण्यात आले होते.
सध्या महिंद्रा एक्सयूवी 300 एकूण 6 मोनो टोन कलर ऑप्शनमध्ये येते. याशिवाय, कंपनी 6 सप्टेंबरला एक्सयूव्ही 300 चे इलेक्ट्रिक व्हर्जनही लॉन्च करत आहे. याला Mahindra XUV 400 असे नाव देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा सामना थेट टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्ससोबत असणार आहे.