Maruti Brezza Launch: शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:02 PM2022-06-30T14:02:25+5:302022-06-30T14:04:38+5:30

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन अखेर आज लॉन्च झालं आहे.

new maruti brezza suv launched with sunroof check design interior exterior price details | Maruti Brezza Launch: शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या...

Maruti Brezza Launch: शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या...

googlenewsNext

नवी दिल्ली-

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन अखेर आज लॉन्च झालं आहे. कंपनीनं या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये बरेच नवे फिचर्स दिले आहेत. सर्वात लक्षवेधी बाब अशी की इलेक्ट्रिक सनरुफ (Maruti's First Car with Sunroof) असलेली ही पहिलीच कार ठरणार आहे. नव्या ब्रेझामध्ये काळ्या रंगाचं इलेक्ट्रिक सनरुफ देण्यात आलं आहे. 

मारुतीनं ब्रेझा कारमधून Vitara शब्द आता हटवला आहे. आता ही कार फक्त मारुती ब्रेझा नावानं ओळखली जाणार आहे. मारुतीनं २०१६ साली जेव्हा पहिल्यांदा ब्रेझा लॉन्च केली होती तेव्हा फक्त ही कार डिझेल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध होती. त्यानंतर कंपनीनं कारचं पेट्रोल व्हर्जन बाजारात आणळं होतं. नवी ब्रेझा पेट्रोल इंजिनमध्येही उपलब्ध करुन देण्यात आली आहे आणि यात मारुती Smart Hybrid टेक्नोलॉजीचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

पावरमध्ये दमदार आहे Brezza 
नव्या ब्रेझामध्ये 1.5 लीटर ड्युअल जेट के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन नुकतंच मारुतीनं Ertiga आणि XL6 मध्येही उपलब्ध करुन दिलं आहे. इंजिन 101bhp ची सर्वाधिक पावर आणि 137Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील मिळणार आहेत. 

Brezza मध्ये पहिल्यांदा 'हे' फिचर्स
नव्या ब्रेझामध्ये अनेक नवे फिचर्स देण्यात येणार आहेत. जसं की इलेक्ट्रिक सनरुफ मारुतीच्या कारमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. तसंच अनेक फिचर्स हे नुकत्याच लॉन्च झालेल्या Baleno Facelift मधून घेण्यात आले आहेत. ब्रेझामध्ये ९ इंचाची फ्लोटिंग SmartPlay Pro+ इन्फोटेन्मेंट सिस्टम, हेडअप डिस्प्ले आणि ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा असे फिचर्स असणार आहेत. याशिवाय कारमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्लेचाही पर्याय देण्यात आला आहे.

कारमध्ये सराऊंडेड साऊंड सेन्स ऑडियो टेक्नोलॉजी देखील देण्यात आली आहे. तसंच केबिनमध्ये तुम्हाला अॅम्बियन्स मूड लायटिंग, वायरलेस चार्जिंगसारखे फिचर्स देखील मिळणार आहेत. कारमधील इन्फोटेन्मेंट सिस्टम व्हाइस कंट्रोलवर काम करेल. एकूण ९ रंगात कार उपलब्ध होणार आहे. तर ही कार Lxi, VXi, ZXi आणि ZXi Plus अशा व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Brezza ची किंमत किती?
नव्या मारुती ब्रेझाची किंमत सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा थोडी अधिक असणार आहे. या कारची किंमत ७.९९ लाखांपासून सुरू होत आहे. तर वेगवेगळ्या व्हेरिअंटसाठी वेगवेगळ्या किमती आहेत. तर टॉप व्हेरिअंटची किंमत १३.९६ लाख इतकी असणार आहे. 

Web Title: new maruti brezza suv launched with sunroof check design interior exterior price details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.