New Maruti Suzuki Alto k10 चं लाँचपूर्वीच बुकिंग सुरू; पाहा किती आहे टोकन अमाऊंट, स्पेसिफिकेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 05:07 PM2022-08-11T17:07:34+5:302022-08-11T17:07:56+5:30
2022 New Maruti Suzuki Alto k10 च्या लाँचपूर्वीच याची बरीच माहिती समोर येत आहे. तसंच कंपनीनं याचा टीझरही लाँच केला आहे.
New Maruti Suzuki Alto K10 लाँच करण्यापूर्वी कंपनीने या लोकप्रिय हॅचबॅकचा टीझर रिलीज केला आहे. ह्या टिझरमध्ये कारची फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि डिझाइनबद्दल बरीच माहिती दिली आहे. मारुती सुझुकीनं हॅचबॅक सेगमेंटमध्ये वाढती मागणी पाहता आपली ही हॅचबॅक कार पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला होता.
कंपनीने जारी केलेल्या टीझर आणि रिपोर्टनुसार, नवीन मारुती अल्टो K10 एकदम नवीन डिझाइन, नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह सादर केली जाणार आहे. नव्या कारची लांबी, रुंदी आणि उंची ही जुन्या कारपेक्षा अधिक असेल. Maruti Suzuki ही नवीन Maruti Suzuki Alto K10 भारतात 18 ऑगस्ट रोजी लाँच करेल. पण लाँचपूर्वीच कंपनीने त्याची प्री-बुकिंग देखील सुरू केली आहे.
ज्या ग्राहकांना 2022 न्यू Alto K10 खरेदी करण्यात रस आहे ते मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते बुक करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन कारचे प्री-बुक करू शकतात. या कारच्या प्री-बुकिंगसाठी कंपनीने 11,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे. या कारच्या खास बाबींबद्दल सांगायचं झालं तर ती लेटेस्ट मॉड्यूलर हार्टटेक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर कंपनीनं यापूर्वी मायक्रो एसयुव्ही एसप्रेसो, सेलेरियो, बलेनो आणि अर्टिगा तयार केल्या होत्या. ही कार 12 व्हेरिअंटसह बाजारात दाखल होण्याची शक्यता असून त्यात मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन मिळण्याचीही शक्यता आहे.
काय आहे स्पेसिफिकेशन्स?
मारुती अल्टो K10 च्या डायमेन्शनबद्दल सांगायचे तर, ही कार आधीच्या कारपेक्षा थोडी स्पेशिअस आहे. कंपनीने तिची लांबी 3530 मिमी, रुंदी 1490 मिमी आणि उंची 1520 मिमी ठेवली आहे. या डायमेंशनसह 2380 मिमी चा व्हील बेस देण्यात आला असून 160 मिमी ग्राउंड क्लियरन्सही असेल.