उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 07:18 PM2022-01-31T19:18:38+5:302022-01-31T19:19:08+5:30

Maruti Wagon R: सर्वसामान्य भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या 'मारुती'च्या 'वॅगन-आर' (WagonR) कारचं नवं मॉडल येणार असल्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर या कारबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

New Maruti Suzuki Wagon R launch in February know what will the features and price | उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स...

उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स...

googlenewsNext

Maruti Wagon R: सर्वसामान्य भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या 'मारुती'च्या 'वॅगन-आर' (WagonR) कारचं नवं मॉडल येणार असल्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर या कारबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच मारुतीकडून नवी वॅगन-आर कार बाजारात दाखल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहहे. मारुती सुजुकी इंडिा लिमिटेडनं २०२१ मध्येच सेल्स चार्टमध्ये मारुती वॅगन आर कारला लिस्ट केलं होतं. यात कारच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता या वर्षात वॅगन-आर कार अपग्रेड होणार असून फेब्रुवारी महिन्यात नवं मॉडल दाखल होणार आहे. 

थर्ड जनरेशन Maruti Suzuki Wagon R न २०१९ सालच्या सुरुवातीला लॉन्च झाली होती. कथित माहितीनुसार फेब्रुवारी २०२२ मध्ये या मॉडलला एक मिड-लाइफ अपडेट मिळणार आहे. दरम्यान, कारमध्ये फार मोठे बदल केले जाण्याची शक्यता फार कमी आहे. यात कारच्या समोरच्या बाजूला एक ट्वीक्ड बम्पर दिला जाण्याची शक्यता आहे. तर टॉप-व्हेरिअंटमध्ये १५ इंचाचे अलॉय व्हिल्सी दिले जाण्याची शक्यता आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये लॉन्च होणाऱ्या वॅगन-आरच्या नव्या अपग्रेडमध्ये काही नव्या रंगसंगतीचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. मॅन्युअल ट्रिम्समध्ये हिल होल्ड असिस्टंट फक्शन उपलब्ध करुन दिलं जाण्याचीही शक्यता आहे. तसंच इंधन बजत होण्यासाठी इनअॅक्टीव्ह स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजी दिली जाऊ शकते. तसंच टूल लिस्टमध्ये अॅपल कालप्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हिटीसोबत सात इंचाचा स्मार्ट-प्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोन्टेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रीकली फोल्डेबल ओरव्हीएम, माऊंटेड कंट्रोलसह स्टिअरिंग व्हील, सेमी-डिजिटल इक्विपमेंट कन्सोल असे फिचर्स दिले जाऊ शकतात. चांगल्या परफॉरमन्ससाठी १.० लीटर पेट्रोल आणि १.२ लीटर पेट्रोल इंजिन उपलब्ध करुन देण्यात येईल. 

फाइव्ह स्पीड मॅन्युअल आणि फाइव्ह स्पीड एएमटी ट्रान्समिश पर्याय देखील असणार आहेत. तसंच अँटी लेव्हल एलएक्सआय ट्रिम देखील सीएनजी व्हेरिअंटमध्ये दिला जाऊ शकतो. दरम्यान, नव्या मॉडलच्या किमतीत जास्त वाढ केली जाणार नाही. बेस व्हेरिअंटसाठी मूळ किंमत जवळपास ५.३ लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंटची किंमत ६.८ लाख (एक्स-शोरुम) इतकी असू शकते. 

Web Title: New Maruti Suzuki Wagon R launch in February know what will the features and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.