पहिल्यांदाच मारूतीच्या कारमध्ये 'सनरूफ' फिचर्स, किंमतीसह सर्वकाही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 07:30 PM2022-06-09T19:30:42+5:302022-06-09T19:31:02+5:30

याशिवाय ड्युअल टोन डॅशबोर्ड, 360 कॅमेरा, ऑटो एअर कंडिशन वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील.

New Maruti Vitara Brezza Arrival This Month Confirmed | पहिल्यांदाच मारूतीच्या कारमध्ये 'सनरूफ' फिचर्स, किंमतीसह सर्वकाही जाणून घ्या

पहिल्यांदाच मारूतीच्या कारमध्ये 'सनरूफ' फिचर्स, किंमतीसह सर्वकाही जाणून घ्या

Next

मारुती(Maruti) या महिन्यात विटारा ब्रेजा (Vitara Brezza) नव्या रुपात बाजारात आणणार आहे. कंपनीने मारुती ब्रेझा (New Brezza Launch Date) लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. ब्रेझा ३० जून रोजी तिच्या नव्या शैलीत बाजारात येईल. विटारा ब्रेझा ही मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. म्हणूनच मारुतीने न्यू ब्रेझामध्ये एक वैशिष्ट्य जोडले आहे, जे आतापर्यंत या कंपनीच्या कोणत्याही वाहनात नाही. बाजारात न्यू ब्रेझा टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या वाहनांना टक्कर देईल. 

शानदार 'सनरूफ'
मारुतीने पहिल्यांदाच त्यांच्या कोणत्याही वाहनात सनरूफ(Sunroof) फीचर जोडले आहे. नवीन ब्रेझा ही मारुतीची सनरूफ असलेली पहिली कार असेल. याशिवाय कंपनीने या वाहनात आणखी अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. नवीन ब्रेझा लक्झरीसह अतिशय हायटेक असेल. यात सनरूफसह हेड अप डिस्प्ले (HUD) देखील मिळेल. कंपनी त्याच्या फ्रंट ग्रिलला एक शार्प लुक देऊ शकते, ज्यामुळे ते अधिक स्पोर्टी होईल. त्याच वेळी, यात नवीन एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, नवीन अलॉय व्हील आणि रिफ्रेश केलेले डिझाइन एलीमेंटस मिळतील.

'ही' आहेत वैशिष्ट्ये 
मारुती ब्रेझाच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यात फ्लोटिंग टच-स्क्रीन फोन कनेक्टिव्हिटी अॅप्स मिळू शकतात, याशिवाय ड्युअल टोन डॅशबोर्ड, 360 कॅमेरा, ऑटो एअर कंडिशन वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील. मागील एसी व्हेंट्स आणि सनरूफसह येत असलेली, मारुती ब्रेझा संपूर्ण एसयूव्हीसारखी दिसेल. मारुती सुझुकीने २०२२ मॉडेलमधून विटाराला वगळलं आहे आणि आता या एसयूव्हीचे नाव मारुती ब्रेझा असेल.

यावर्षी मारुतीचं तिसरी लॉन्चिंग 
यावेळी देखील Brezza मध्ये 1.5-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन असू शकते. मारुतीने नुकतेच अपडेट केलेले Ertiga आणि XL6 मध्ये देखील हेच इंजिन वापरले आहे. या कारची सुरुवातीची किंमत ८ लाख रुपयांपर्यंत असू शकते (New Brezza 2022 Expected Price) यावेळी कंपनी ब्रेझामध्ये ऑटोमेटिक क्लाइमेंट कंट्रोलसह 6 एअरबॅग देखील देऊ शकते. मोठ्या आकाराच्या वाहनांच्या बाबतीत मारुतीची या वर्षातील ही तिसरी लाँचिंग आहे. यापूर्वी कंपनीने Ertiga आणि XL6 लॉन्च केले आहेत.

Web Title: New Maruti Vitara Brezza Arrival This Month Confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marutiमारुती