Shine आता एसयुव्हीतही! एमजी हेक्टरचे नवे व्हेरिअंट लाँच; जाणून घ्या किंमत आणि काय नवे...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 06:51 PM2021-08-12T18:51:48+5:302021-08-12T18:52:06+5:30
New MG Hector Shine: नव्या इलेक्ट्रिक सनरुफसह सीव्हीटी, पेट्रोल एमटी आणि डिझेल एमटी ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध.
मुंबई : हेक्टरच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, एमजी मोटर इंडियाने (MG motor India) आज एमजी हेक्टरचे 'शाईन' व्हेरिअंट लॉन्च केले. पेट्रोल एमटी, डिझेल एमटी आणि पेट्रोल सीव्हीटी पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या हेक्टर शाइनची (New MG Hector Shine) किंमत १४.५१ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरु होते. (New MG Hector Shine launched in priced at ₹14.51 lakh ex-showroom, New Delhi)
Citroen C3: परवडणाऱ्या फ्लेक्स फ्युअलवर Citroen पहिली कार आणणार; किंमतही नेक्सॉनएवढी
नव्या ट्रिममध्ये सर्वात नवे इलेक्ट्रिक सनरुफ, १७-इंच अलॉय व्हील्स आणि २६.४ सेमी एचडी टचस्क्रीन एव्हीएन सिस्टिम, अॅपल कार प्लेसह आणि अँड्रॉइड ऑटो या सुविधा आहेत. तसेच शाइन सीव्हीटीमध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, पुश बटण स्टार्ट/स्टॉप आणि स्मार्ट एंट्री, क्रोम डोअर हँडल आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग आदींची सुसज्जता आहे.
एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, "हेक्टरचा भारतातील दुसरा वर्धापन दिन हे हेक्टरच्या पोर्टफोलिओला आणखी बळकटी देण्यासाठीचे एक निमित्त आहे. शाइन व्हेरिएंटमुळे हेक्टर परिवार श्रेणीची शोभा वाढवते. यात पाच प्रकार असून ग्राहकांना निवड करण्याची शक्ती प्रदान करते. एमजीच्या कुटुंबात नव्या सदस्याचे स्वागत करण्याची ही एक संधी आहे.”
MG Motor: ७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्ही लॉन्च; किंमत ३७.२८ लाख रुपयांपासून
तसेच, एमजी एक निवडक अॅक्सेसरीजचे पॅकेजदेखील प्रदान करत आहे, यात उच्च सौंदर्यात्मक आणि कार्यक्षम मूल्य असलेल्या गोष्टी असतील. जसे की, लेदरेट सीट कव्हर्स आणि स्टीअरिंग व्हील कव्हर, विंडो सनशेड्स, एअर प्युरिफायर, वायरलेस फोन चार्जिंग आणि थ्री डी केबिन मॅट्स आकर्षक किंमतीच्या ऑफरवर असतील. या कारला एमजी शील्ड इन्शुरन्सदेखील असेल. याअंतर्गत ५-५-५ ऑफर तसेच पाच वर्षांची अमर्याद किलोमीटरची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि पाच वर्षांची लेबर फ्री सर्व्हिस यांचा समावेश आहे.