लाडक्या 'सँट्रो' कारची छोटी बहीण येतेय; स्वागताला तयार राहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 06:43 PM2018-08-01T18:43:14+5:302018-08-01T18:43:57+5:30
काही वर्षांपूर्वी ह्युंदाईच्या सँट्रो कारनं भारतातील रस्ते व्यापून टाकले होते. आता ही कंपनी मध्यमवर्गीयांसाठी छोटी हॅचबॅक कार घेऊन येतेय.
नवी दिल्लीः काही वर्षांपूर्वी ह्युंदाईच्या सँट्रो कारनं भारतातील रस्ते व्यापून टाकले होते. आता ही कंपनी मध्यमवर्गीयांसाठी छोटी हॅचबॅक कार घेऊन येतेय. तिचं नाव ४ ऑक्टोबरला जाहीर होणार असून, तिचं मॉडल सँट्रोशी मिळतंजुळतं आहे. ह्युंदाईची ही नवी कार EONची जागा घेणार आहे. नव्या कारमध्ये प्रीमियम कॅबिनही देण्यात येणार आहे.
ह्युंदाईचं हे नवं मॉडल Santro Xingचं अपडेटेड व्हर्जन असणार आहे. या कारमध्ये 1.1 लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. ह्युंदाईची ही पहिली कार असेल ज्यामध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार प्रतिलिटरमध्ये 25 किमीच्या आसपास धावणार आहे. तसेच या कारमध्ये 5 स्पीड गीअर बॉक्सही बसवण्यात आला आहे. या सेंट्रोच्या कारचा मुकाबला मारुतीच्या सेलेरियो कारबरोबर असेल.
सप्टेंबर 2018मध्ये ह्युंदाई सेंट्रो ही कार 20 वर्षांची होणार आहे. भारतामध्ये 23 सप्टेंबर 1998 साली सेंट्रो कार लॉन्च करण्यात आली होती. मुंबईत टॅक्सी म्हणून सेंट्रो कार बऱ्यापैकी प्रचलित असून, आता या कारचे उत्पादन बंद झाल्याने जुन्या कारही फार चालत आहेत. या कारची किंमत 3.5 लाख रुपयांच्या आसपास आहे.