पॉवरफुल इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह लाँच होणार रॉयल एनफिल्डची नवीन बाईक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:26 PM2023-05-22T20:26:24+5:302023-05-22T20:27:01+5:30

कंपनीने नवीन Interceptor Bear 650 नेमटॅगसाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे.

new royal enfield scrambler could be called interceptor bear 650 | पॉवरफुल इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह लाँच होणार रॉयल एनफिल्डची नवीन बाईक!

पॉवरफुल इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह लाँच होणार रॉयल एनफिल्डची नवीन बाईक!

googlenewsNext

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारात रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) आगामी बाईक बाजारात लाँच होणार आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्ड आपल्या 650cc प्लॅटफॉर्मवर आधारित अनेक नवीन बाईकवर काम करत आहे. कंपनी Shotgun 650, नवीन फेअर Continental GT 650  आणि नवीन 650cc Scrambler बाईकची चाचणी करत आहे. यातच आता कंपनीने नवीन Interceptor Bear 650 नेमटॅगसाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे.

या नवीन Interceptor Bear 650 बाईकमध्ये काही नवीन डिझाईनचे भाग आहेत, जे आगामी हिमालयन 450 सोबत शेअर करण्यात आल्याचे दिसत आहेत. तसेच, स्पॉटेड मॉडेलला रेट्रो-स्टाईल गोल आकाराचे हेडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर, टेल-लाइट आणि टर्न इंडिकेटर दिले जात आहेत. नवीन Royal Enfield Interceptor Bear 650 Scrambler ला ट्रियरड्रॉप आकाराची इंधन टाकी दिली जाणार आहे.

पॉवरफुल इंजिन देण्यात येणार
कंपनीकडून आगामी बाईकमध्ये एक अतिशय पॉवरफुल इंजिन देण्यात येणार आहे. हे 648 सीसी, एअर-/ऑइल-कूल्ड, समांतर ट्विन इंजिनद्वारे समर्थित असेल. हे इंजिन 47 Bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असणार आहे. हे टू-इन-वन एक्झॉस्ट सेटअपसह येत असून याला मानक म्हणून ड्युअल चॅनल एबीएससह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेकचा सपोर्ट दिला जात आहे. हे वायर-स्पोक युनिट्ससह येईल जे बेसी ट्यूबसह सुसज्ज असणार आहे.

किती असेल किंमत?
याचबरोबर या बाईकच्या किमतीबाबत बोलायचे झाले तर कंपनीकडून अजूनही या बाईकची किंमत जाहीर करण्यात अली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, कंपनी या बाईकला बाजारात 2 ते 2.5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात येईल.

Web Title: new royal enfield scrambler could be called interceptor bear 650

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.