New Rule of BS6: नवा नियम, टाटा अल्ट्रूझसह या १७ लोकप्रिय कार बंद होणार? काय आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:13 PM2022-12-22T12:13:08+5:302022-12-22T12:13:39+5:30
मीडिया रिपोर्टनुसार बीएस ६ मानकांमध्ये एक नवा नियम येत आहे. मानकांचा दुसरा टप्पा येत्या एप्रिलपासून लागू होणार आहे.
नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. काही दिवसांतच हे वर्ष संपणार आहे. नव्या वर्षाबरोबर नवे नियम लागू होतील. कोरोनाच्या गेल्या तीन वर्षांत हे वर्ष ऑटो कंपन्यांसाठी खूप चांगले गेले आहे. परंतू, एक नवा नियम येत्या वर्षात ऑटो कंपन्यांची डोकेदुखी वाढविणार आहे. एक दोन नाही तर बाजारातून १७ कार बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार बीएस ६ मानकांमध्ये एक नवा नियम येत आहे. मानकांचा दुसरा टप्पा येत्या एप्रिलपासून लागू होणार आहे. रियल ड्राइविंग इमिशन (RDE) या नियमानुसार ज्या गाड्या चालविताना जास्त वायूंचे उत्सर्जन करतात त्या डिसकंटीन्यू होणार आहेत. यामध्ये अधिकतर डिझेल कार आहेत.
बीएस६ मानकांची अंमलबजावणी २०२० मध्ये करण्यात आली होती. त्याचा दुसरा टप्पा आता सुरु होत आहे. आरडीई पहिल्यांदा युरोपमध्ये लागू करण्यात आला होता. नव्या नियमांनुसार वाहन निर्माता कंपन्यांना वास्तविक परिस्थितींमध्ये उत्सर्जन मानकांना पूर्ण करावे लागणार आहे. यामुळे एप्रिलपासून ऑटो सेक्टरवर याचा गंभीर परिणाम दिसून येणार आहे.
रिअल-टाइम ड्रायव्हिंग उत्सर्जन स्तरांवर लक्ष ठेवण्यासाठी RDE ला ऑनबोर्ड सेल्फ-डायग्नोस्टिक डिव्हाइसेस देणे आवश्यक आहे. उत्सर्जनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करण्यासाठी हे उपकरण उत्प्रेरक कनवर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर सारख्या प्रमुख भागांचे सतत निरीक्षण करेल. वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या सेमीकंडक्टरचे थ्रॉटल, क्रँकशाफ्टची स्थिती, हवेचा दाब, इंजिनचे तापमान आणि उत्सर्जन (पार्टिक्युलेट मॅटर, नायट्रोजन ऑक्साईड, CO2, सल्फर) इत्यादींचे निरीक्षण केले जाते. तसेच प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्टरचाही वाहनांमध्ये समावेश करावा लागणार आहे.
या साऱ्या उपद्व्यापामुळे कारच्या किंमती तर वाढतीलच शिवाय कंपन्यांसाठी देखील ही डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे कंपन्या अशा गाड्यांची विक्रीच बंद करण्याची शक्यता आहे.
या कार आहेत यादीत...
- टाटा अल्ट्रोझ डिझेल
- महिंद्रा मराझो
- महिंद्रा अल्टुरास G4
- महिंद्रा KUV100
- स्कोडा ऑक्टाव्हिया
- स्कोडा सुपर्ब
- रेनॉल्ट KWID 800
- निसान किक्स
- मारुती सुझुकी अल्टो 800
- टोयोटा इनोव्हा क्रिस्टा पेट्रोल
- hyundai i20 डिझेल
- ह्युंदाई व्हर्ना डिझेल
- होंडा सिटी डिझेल
- होंडा अमेझ डिझेल
- होंडा जॅझ
- होंडा WR-V