आता हेल्मेट घातलेलं असतानाही कापलं जाणार 2000 रुपयांचं चलान! जाणून घ्या नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:57 PM2022-05-19T12:57:55+5:302022-05-19T13:15:37+5:30

...तर कापलं जाईल 20 हजार रुपयांपेक्षाही अधिकचं चलान!

new rules motorcycle scooter 2000 rs traffic challan if helmet strap not tied or not confirming bis | आता हेल्मेट घातलेलं असतानाही कापलं जाणार 2000 रुपयांचं चलान! जाणून घ्या नवा नियम

आता हेल्मेट घातलेलं असतानाही कापलं जाणार 2000 रुपयांचं चलान! जाणून घ्या नवा नियम

googlenewsNext

नव्या ट्रॅफिक नियमानुसार, आता आपण हेल्मेट घातले असतानाही 2000 रुपयांचे चलान कापले जाऊ शखते. कारण मोटार वाहन कायद्यानुसार, आपण मोटारसायकल अथवा स्कूटर चालवताना हेल्मेटची स्ट्रिप लावली नसेल, तर नियम 194D MVA नुसार आपले 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शखते. याच बरोबर, आपण सदोष हेल्मेट (BIS नसलेले) घातले असेल तर 194D MVA याच नियमानुसार आपले 1000 रुपयांचे चलानही कापले जाऊ शकते. अशा पद्धतीने हेल्मेट घातले असतानाही, आपण नियमांचे पालन केले नाही तर, आपल्याला 2000 रुपयांचा दंड होऊ शकतो.

...तर कापलं जाईल 20 हजार रुपयांपेक्षाही अधिकचं चलान - 
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, आपले वाहन ओव्हरलोडेड असेल तर, आपल्याला 20000 रुपये एवढा जबरदस्त दंडही होऊ शकतो. याशिवाय असे केल्यास आपल्याला प्रति टन 2000 रुपयांचा अतिरिक्त दंडही द्यावा लागू शकतो. महत्वाचे म्हणजे असे या पूर्वीही अनेक वेळा झाले आहे. 

चलान कापले गेले आहे की नाही, असं करा चेक -
https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलान स्टेटस हा पर्याय निवडा. यानंतर आपल्याला चलान क्रमांक, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) असे पर्याय दिसतील. यांपैकी वाहन नंबर हा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. यानंतर चलानचे स्टेटस आपल्या सोमोर येईल.

ट्रॅफिक चलान ऑनलाईन भरण्याची पद्धत -
https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. यानंतर, चलानशी संबंधित आवश्यक माहिती भरा आणि कॅप्चा टाका. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. यानंतर एक नवीन पान ओपन होईल. यावर चालानसंदर्भात माहिती असेल. यानंतर, आपल्याला जे चलान भरायचे आहे ते चलान शोधा. चालानासोबतच आपल्याला ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. यानंतर, पेमेंट कन्फर्म करा. यानंतर आपले ऑनलाईन चलान भरले जाईल.

Web Title: new rules motorcycle scooter 2000 rs traffic challan if helmet strap not tied or not confirming bis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.