इलेक्ट्रिक THAR सह नवीन Scorpio-N पिक-अप; १५ ऑगस्टसाठी 'महिंद्रा'ची खास तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 01:21 PM2023-08-01T13:21:09+5:302023-08-01T13:21:50+5:30
महिंद्रा थार इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
नवी दिल्ली – यंदाच्या १५ ऑगस्टला देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या उत्सावाला खास बनवण्यासाठी महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीकडून मोठी तयारी सुरू आहे. साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या महिंद्राच्या ग्लोबल इवेंट फ्यूचरएस्केमध्ये कंपनी काही नवीन मॉडेल आणि कॉन्सेप्टवरून पडदा उचलणार आहे. या इव्हेंटमध्ये थार इलेक्ट्रिक(Thar Electric) पासून लेटेस्ट जेनरेशन स्कोर्पियोचा पिक अप ट्रक उत्पादन पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय महिंद्रा थारचे फाईव्ह डोर व्हेरिएंटची लॉन्च करणार आहे.
कशी असेल Thar Electric?
मीडिया रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात थार इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट लॉन्च करणार आहे. जी फोर व्हिल ड्राइव्ह सेटअपसह असेल. यात क्वॉड मोटारचा वापर करण्यात आला आहे. सामान्यत: इलेक्ट्रिक फोर व्हिलर ड्राईव्ह वाहनांमध्ये डुअल मोटार सिस्टमचा प्रयोग केला जातो. या कंपनीच्या नव्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर बेस्ड असणार की रेग्युल पेट्रोल मॉडेलसारखी बॉडी ऑन फ्रेमवर तयार केले जाईल हे अद्याप स्पष्ट नाही.
महिंद्रा थार इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, यात कंपनी क्रैबवॉक फिचर्सही जोडणार आहे. थार इलेक्ट्रिक मॉडेलशिवाय महिंद्रा स्कोर्पियो एन पिक अप व्हर्जनही लॉन्च करणार आहे. विशेषत: दक्षिणी आफ्रिका मार्केटमध्ये ही तयार करण्यात आली आहे. कंपनीने अलीकडे एक टिझरही पोस्ट केला आहे. त्यात ग्लोबल पिक अप व्हिजन असं लिहिलं आहे. रेग्युलर स्कोर्पियो एन तुलनेत यात काही बदल केले असतील. त्यात व्हिलबेस वाढवला जाऊ शकतो. Thar Electric पुढील वर्षापर्यंत बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे.