लेक्ससची नवी सेदान; 22 चे मायलेज, 10 एअरबॅग, 17 स्पीकर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 04:12 PM2018-09-10T16:12:08+5:302018-09-10T16:13:07+5:30

जागतिक दर्जाची कार निर्माती कंपनी लेक्ससने आपली नवी सेदान कार भारतात आज लाँच केली. लक्झरी क्लासमध्ये पहिल्यांदाच प्रतीलिटरला 22 किमीचे मायलेज देणारी ही कार आहे.

New sedan of Lexus; 22's mileage, 10 airbags, 17 speakers ... | लेक्ससची नवी सेदान; 22 चे मायलेज, 10 एअरबॅग, 17 स्पीकर्स...

लेक्ससची नवी सेदान; 22 चे मायलेज, 10 एअरबॅग, 17 स्पीकर्स...

googlenewsNext

नवी दिल्ली : जागतिक दर्जाची कार निर्माती कंपनी लेक्ससने आपली नवी सेदान कारभारतात आज लाँच केली. लक्झरी क्लासमध्ये पहिल्यांदाच प्रतीलिटरला 22 किमीचे मायलेज देणारी ही कार आहे. या कारमधील इतर फिचर्स वाचून धक्काच बसणार आहे. 


लेक्ससने ES300h या कारची सातवे व्हर्जन असलेली हायब्रिड इलेक्ट्रीक कार लाँच केली. ही कार हायब्रिड असल्याने 22 किमीचे मायलेज देणार आहे. यामुळे ही कार भल्याभल्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत आहे 59.13 लाख रुपये. या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्सही मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या कंपन्यांना मागे टाकणारे आहेत. या कारमध्ये तब्बल 10 एअरबॅग देण्यात आले आहेत. तसेच संगिताचा आनंद घेण्यासाठी चार-पाच नव्हे तब्बल 17 स्पीकर्स देण्यात आले आहेत. लांबीचा व्हीलबेस आरामदायक प्रवासासाठी आहे. तसेच या कारमध्ये 5 जण आरामात बसू शकणार आहेत. 

सुरक्षेसाठी एअरबॅग बरोबरच हिल स्टार्ट असिस्ट, व्हीकल स्टॅबिलिटी कंट्रोल आणि एंटी-थेफ्ट सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच ब्रेक-इन आणि टिल्ट सेंसर्सही देण्यात आले आहेत. 


इंजिन : Lexus ES 300h या सेदान कारमध्ये 205 लीटर 4 सिलिंडरचे पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनामध्ये चौथे व्हर्जन असलेले हायब्रिड तंत्रज्ञान असणार आहे. हे इंजिन 178 पीएस ताकद आणि 221 नॅनोमीटर एवढा टॉर्क देते. हे इंजिन Euro-6 मानांकन पूर्ण करते. कंपनीने दावा केला आहे की, ही कार 22.37 किमी प्रती लीटर मायलेज देते. 
 

Web Title: New sedan of Lexus; 22's mileage, 10 airbags, 17 speakers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.