नवीन Sonet 25 सुरक्षा फिचरसह लॉन्च, किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:37 PM2024-01-12T12:37:59+5:302024-01-12T12:39:30+5:30
किआ सोनेटच्या फेसलिफ्ट अवताराची अनेकजण वाट पाहत होते, Kia ने Sonet च्या फेसलिफ्ट अवतारच्या किंमती जाहीर केल्या आहेत.
किआने नुकतीच सोनेट लाँच केली आहे. कंपनीने या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या किमती जाहीर केल्या आहेत. तुम्हाला नवीन डिझाइन आणि अपग्रेड केलेल्या फिचरसह Kia Sonet चा फेसलिफ्ट केलेला अवतार मिळेल. नवीन सोनेटमध्ये, कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी 25 सुरक्षा फिचर दिले आहेत, यात 10 ADAS आणि 15 उच्च-सुरक्षा फिचरचा समावेश आहे.
तुम्हाला Kia Sonet चा फेसलिफ्ट अवतार एकूण 19 व्हेरिएंटमध्ये मिळेल. यामध्ये 3 पेट्रोल आणि 5 डिझेल (मॅन्युअल) व्हेरियंट, 3 पेट्रोल आणि 2 डिझेल व्हेरियंट, 7DCT सह 3 पेट्रोल व्हेरिएंट आणि 3 डिझेल अॅटोमेटीक व्हेरिएंट उपलब्ध असतील.
या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत 7 लाख 99 हजार रुपयां पासून सुरू होते, ही किंमत या कारच्या बेस व्हेरिएंटसाठी आहे. तर, या Kia वाहनाच्या टॉप व्हेरिएंटसाठी 15 लाख 69 हजार रुपये खर्च करावे लागतील.
तुम्हाला तीन इंजिन पर्यायांमध्ये Kia Sonet चा फेसलिफ्ट अवतार मिळेल, पहिला प्रकार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 1.2 लिटर पेट्रोल मोटर देईल.
दुसरा प्रकार iMT सेमी ऑटोमॅटिक किंवा DCT ड्युअल क्लच ट्रान्समिशन पर्यायासह 1.0 लिटर टर्बो पेट्रोल मोटरसह उपलब्ध असेल.
तिसरा व्हेरिएंट 1.5 लिटर CRDi डिझेल इंजिन, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड iMT आणि 6 स्पीड एटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह उपलब्ध असेल.
नवीन Sonet ला 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. तसेच नवीन सोनेटमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे या SUV मध्ये फ्रंट टक्कर-अव्हॉइडन्स असिस्ट, लीडिंग व्हेईकल डिपार्चर अलर्ट आणि लेन फॉलोइंग असिस्ट यांसारखी लेव्हल 1 ADAS फिचर देण्यात आली आहेत.
टाटा समूह दोन कंपन्या विकत घेण्याच्या तयारीत; पुढील आठवड्यात घोषणा, जाणून घ्या नावं?
या कारच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ESC आणि हिल स्टार्ट असिस्ट हे फिचर उपलब्ध आहेत. कॉर्नरिंग लॅम्प्स, फोर-वे पॉवर ड्रायव्हर सीट आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरसह 360 डिग्री कॅमेरा यांसारख्या वाहनाच्या शीर्ष प्रकारांमध्ये काही अतिरिक्त फिचर दिले आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला हवेशीर फ्रंट सीट्स, सनरूफ आणि एलईडी अॅम्बियंट लाइटिंग सारखी प्रीमियम फिचर मिळतील.