Suzuki Alto: नव्या अल्टोवरून सुझुकीने पडदा हटविला; 660cc चे इंजिन आणि बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:33 PM2021-11-30T12:33:19+5:302021-11-30T12:33:45+5:30

New Suzuki Alto 2022: ऑल्टो ही एक बजेट कार म्हणून भारतात खूप लोकप्रिय आहे आणि लोक या कारच्या पुढच्या मॉडेलची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत.

New Suzuki Alto Officially Revealed In Japan; 660cc engine and more | Suzuki Alto: नव्या अल्टोवरून सुझुकीने पडदा हटविला; 660cc चे इंजिन आणि बरेच काही

Suzuki Alto: नव्या अल्टोवरून सुझुकीने पडदा हटविला; 660cc चे इंजिन आणि बरेच काही

Next

जपानची दिग्गज कंपनी सुझुकीने आपल्या देशात म्हणजेच जपानमध्ये सुझुकी अल्टो (New Gen Suzuki Alto) ची 9 वी जनरेशन दाखविली आहे. अल्टो ही जगातील सर्वाधिक खपाची कार आहे. कारण भारतात ही कार पाण्यासारखी विकली जाते. जपानमधील ही कार 660 सीसी, माईल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिनसोबत बाजारात उतरविले जाणार आहे. याशिवाय़ कारमध्ये अॅक्टिव्ह ड्रायव्हर्स असिस्टदेखील देण्यात आले आहे. 

जपानमध्ये सादर केलेली Suzuki Alto Kei भारतात उपलब्ध असलेल्या Maruti Suzuki Alto पेक्षा वेगळी आहे. नावाशिवाय दोन गाड्यांमध्ये साम्य नाही, त्यामुळे नावाने गोंधळून जाऊ नका. जपानमध्ये कंपनीने 7 वर्षांनंतर या कारचे नवीन जनरेशन मॉडेल सादर केले आहे. कारचे 8व्या पिढीचे मॉडेल 2014 साली सादर करण्यात आले होते.

ऑल्टो ही एक बजेट कार म्हणून भारतात खूप लोकप्रिय आहे आणि लोक या कारच्या पुढच्या मॉडेलची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. नवीन अल्टो अनेक बदलांसह बाजारात येणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नवीन मॉडेल HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असेल जो Wagon R आणि S-Presso मध्ये वापरला जातो. कारला 660cc नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 49bhp पॉवर जनरेट करते.

अल्टोसह, ग्राहक नुकत्याच लाँच केलेल्या नवीन सेलेरियोची देखील वाट पाहत होते. या कारच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर सेलेरियोचे नवीन मॉडेल सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठे आणि चांगले आहे. कंपनीने ती भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी कार म्हणून लॉन्च केली आहे.

Web Title: New Suzuki Alto Officially Revealed In Japan; 660cc engine and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.