मार्केटमध्ये आली नवीन Tata Harrier, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 06:39 PM2023-10-17T18:39:26+5:302023-10-17T18:40:50+5:30
ही कार स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि फियरलेस या चार ट्रिम लेव्हलमध्ये मिळणार आहे.
नवी दिल्ली : नवीन 2023 टाटा हॅरियर फेसलिफ्ट अधिकृतपणे करण्यात लाँच आली आहे. ही कार स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि फियरलेस या चार ट्रिम लेव्हलमध्ये मिळणार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन हॅरियर मॅन्युअलची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.49 लाख रुपयांपर्यंत जाते, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट आणि डार्क एडिशनची किंमत 19.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या सर्व किंमती इंट्रोटक्टरी आणि एक्स-शोरूममधील आहेत. या किमतीत हॅरियर जीप कंपास आणि एमजी हेक्टर सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.
Smart MT: 15.49 लाख रुपये
Pure MT: 16.99 लाख रुपये
Pure+ MT (Sunroof Opt): 18.69 लाख रुपये
Adventure MT: 20.19 लाख रुपये
Adventure+ MT (ADAS Opt): 21.69 लाख रुपये
Fearless MT: 22.99 लाख रुपये
Fearless+ MT: 24.49 लाख रुपये
इंजिन
कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 2.0L टर्बो डिझेल इंजिन असेल, जे प्री-फेसलिफ्ट व्हर्जनमधून घेतले गेले आहे. इंजिन हे 170PS पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. खरेदीदारांना 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. ऑटोमेटिक व्हेरिएंटमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील मिळत आहे. अपडेटेड हॅरियर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह अनुक्रमे 16.08kmpl आणि 14.60kmpl मायलेज देऊ शकते, असा टाटा कंपनीचा दावा आहे.
फीचर्स
नवीन टाटा हॅरियर फेसलिफ्टच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. यात आता लेटेस्ट स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी पर्यायांसह एक मोठी 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यासोबतच 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. यात 4-स्पोक स्टीयरिंग व्हील आहे, ज्यामध्ये बॅकलिट टाटा लोगो आहे. तसेच, कारमध्ये दोन टॉगलसह नवीन टच-आधारित हवामान नियंत्रण पॅनेल आहे. याशिवाय, डॅशबोर्डला लेदरेट पॅडिंग आणि ग्लॉसी ब्लॅक सरफेससह फ्रेश फिनिश देण्यात आले आहे. याशिवाय अनेक फीचर्स आहेत.