TVS ची नवीन 125cc स्कूटर Jupiter 125 लाँच, जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:16 IST2021-10-07T20:15:30+5:302021-10-07T20:16:11+5:30
new tvs jupiter 125 launched : प्रीमियम लुक देण्यासाठी कंपनीने स्कूटरला क्रोम टच दिला आहे. स्कूटरच्या बाजूच्या आरशांवर क्रोममधून ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे.

TVS ची नवीन 125cc स्कूटर Jupiter 125 लाँच, जाणून घ्या किंमत...
दुचाकी कंपनी TVS मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय स्कूटर ज्युपिटरचे 125cc व्हर्जन TVS Jupiter 125 गुरुवारी लाँच केले आहे. कंपनीने या स्कूटरच्या डिझाईन आणि लुकला अतिशय वायब्रेंट आणि फ्रेश टच दिला आहे. (new tvs jupiter 125 launched know price features details rival for honda activa suzuki access 125)
कंपनीने TVS Jupiter 125 मध्ये पेट्रोलसाठी नवीन इनलेट दिले आहे. पूर्वी ते सीटच्या मागे असायचे, परंतु यामध्ये ते हँडलच्या अगदी खाली दिले आहे. कंपनीचे हे मॉडेल ड्रम, ड्रम अॅलॉय आणि डिस्क व्हेरिएंटमध्ये येईल.
TVS Jupiter 125 ला प्रीमियम लुक देण्यासाठी कंपनीने स्कूटरला क्रोम टच दिला आहे. स्कूटरच्या बाजूच्या आरशांवर क्रोममधून ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये एलईडी हेडलॅम्प, थ्रीडी लोगो, डायमंड कट अॅलॉय व्हील्स देखील आहेच. कंपनीने Dawn Orange, IndiBlue, Pristine White आणि Titanium Grey कलरमध्ये लॉन्च केले आहे.
याचबरोबर, TVS Jupiter 125 मध्ये सिंगल सिलिंडर 4-स्ट्रोक, एअर-कूल्ड, 124.8cc चे इंजिन आहे. हे जास्तीत जास्त 6kW ची पॉवर आणि 10.5Nm ची पीक टॉर्क देते. यामध्ये 3-स्टेप एडजस्टेबल रियर शॉक सस्पेंशन आहे.
TVS Jupiter 125 मध्ये सीटखाली 33 लीटर डिकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यात 2 हेल्मेट सहज बसवता येतात आणि यामुळे दोन दुचाकीस्वारांसाठी एक परफेक्ट टूव्हिलर वाटते. याशिवाय, TVS Jupiter 125 ची एक्स-शोरूम किंमत (दिल्ली) 73,400 रुपयांपासून सुरू होते. मार्केटमध्ये TVS Jupiter 125 ही Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 ला टक्कर देणार आहे.