नवी Yamaha R15 बाईक, Aerox मॅक्सी स्कूटर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:06 PM2021-09-21T13:06:28+5:302021-09-21T13:07:06+5:30
New Yamaha R15, Aerox Maxi scooter: यामहाने अखेर भारतात नवीन R15 मोटरसायकल लाँच केली आहे. हे या जपानी ब्रँडचे एन्ट्री लेव्हल स्पोर्ट बाईकचे चौथे अपग्रेड आहे. आणखी दोन व्हेरिअंट स्टँडर्ड आणि हाय स्पेक एम मध्ये उपलब्ध आहेत.
Yamaha 2021 R15 Range Launched: यामहाने अखेर भारतात नवीन R15 मोटरसायकल लाँच केली आहे. हे या जपानी ब्रँडचे एन्ट्री लेव्हल स्पोर्ट बाईकचे चौथे अपग्रेड आहे. आणखी दोन व्हेरिअंट स्टँडर्ड आणि हाय स्पेक एम मध्ये उपलब्ध आहेत. (Yamaha 2021 R15, Aerox Maxi scooter Launched)
2021 Yamaha R15 ची किंमत 1,67,800 रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. तर R15M ची किंमत 1,77,800 रुपये ठेवण्यात आली आहे. R15 बरोबरच कंपनीने भारतात Aerox स्कूटर देखील लाँच केली आहे. ही स्कूटर R15 वरच आधारित आहे. या मॅक्सी स्कूटरची किंमत 1,29,000 रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे.
नवीन Yamaha R15 जुन्या मॉडेपेक्षा खूप वेगळी दिसते. यामध्ये एलईडी पायलट लँपसोबत सिंगल एलईडी हेडलँप युनिटसाठी ट्विट एलईडी सेटअप हटविण्यात आला आहे. ही बाईक Yamaha R7 सारखी दिसते. आक्रमक फेअरिंग, मस्क्युलर फ्युअल टँक आणि लांब विंडस्क्रीन मिळते.
\नव्या R15 मध्ये जुनेच 155cc लिक्विड-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. 15 एनएमसह 19 बीएचपी ताकद देते. या इंजिनला स्लिप आणि असिस्ट क्लचसोबत 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. R15M मध्ये चांगल्या प्रदर्शनासाठी क्विक शिफ्टरदेखील मिळतो. 2021 Yamaha R15 मध्ये मोनो शॉकसह इनवर्टेड फोर्क्सचाही वापर करण्यात आला आहे. ब्रेकिंगसाठी डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आला आहे.
New Yamaha Aerox
Yamaha Aerox 155 ही R15 वर आधारित आहे. यामध्ये देखील सारखेच इंजिन देण्यात आले आहे. मात्र, ताकद थोडी कमी करण्यात आली आहे. हे इंजिन 14 Nm आणि 15 bhp ताकद प्रदान करते. स्कूटरमध्ये ट्विन रिअर शॉक ऑब्झर्व्हर आणि स्विंगआर्मसोबत टेलिस्कोपिक फोर्क्स देण्य़ात आले आहेत. ब्रेकिंग ड्युटी एबीएससोबत पुढे आणि मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.