नेक्सॉन, महिंद्राच्या ईव्हीचा गेम होणार; 700km ची रेंज असलेली कार कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 04:07 PM2023-02-11T16:07:02+5:302023-02-11T16:07:31+5:30
एक अशी कंपनी जिने इलेक्ट्रीक कारमध्ये मास्टरी मिळवलेली आहे ती 700km ची रेंज असलेली कार भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत लागली आहे.
देशात सध्या ईलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढू लागली आहे. परंतू, या वाहनांच्या किंमती सध्यातरी आवाक्यात नाहीएत. असे असले तरी वेगवेगळ्या कंपन्या इलेक्ट्रीक वाहने आणण्याच्या मागे लागल्या आहेत. सध्या देशात टाटाच्या कारचा जलवा आहे. महिंद्रा त्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणार आहे. असे असताना एक अशी कंपनी जिने इलेक्ट्रीक कारमध्ये मास्टरी मिळवलेली आहे ती 700km ची रेंज असलेली कार भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत लागली आहे.
सध्या एमजी, टाटा, ह्युंदाई, किया या कंपन्यांमध्ये ४००-५०० च्या रेंज देणाऱ्या कार आहेत. परंतू, ही कंपनी त्याहून कितीतरी जास्त रेंजची कार आणणार आहे. चीनची वाहन निर्माता कंपनी बीवायडीने भारतातील वेबसाईटवर BYD Seal लिस्ट केली आहे. Auto Expo 2023 मध्ये कंपनीने ही कार दाखविली होती.
बीवायडी सील ईव्हीच्या लाँचची वाट पाहिली जात आहे. 2023 च्या चौथ्या तिमाहीत EV भारतात आणण्याची कंपनीची योजना आहे. BYD सील ब्रँडच्या EV प्लॅटफॉर्म-3.0 वर तयार केली आहे. त्याची बॅटरी अल्ट्रा-सेफ ब्लेडवर आधारित आहे. ही जगातील पहिली 8-इन-1 इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आहे. ड्युअल-मोटर 522 एचपी आणि 670 एनएम टॉर्क देते आणि केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेते.
BYD ने किंमत सांगितलेली नाहीय. परंतू ही कार 60 लाख रुपयांच्या आसपास लाँच केली जाऊ शकते.