लाँचिंग आधीच 'या' आलिशान इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक; सिंगल चार्जवर 270 किमी धावणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 04:47 PM2021-12-12T16:47:12+5:302021-12-12T16:48:12+5:30
Mini Cooper SE : कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली होती.
नवी दिल्ली : बीएमडब्ल्यू इंडिया (BMW India) लवकरच भारतात मिनी कूपरचा ( Mini Cooper) चा इलेक्ट्रिक अवतार लाँच करणार आहे, असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता ही कार कोणत्याही स्टिकर्सशिवाय दिसली आहे. बीएमडब्ल्यू ग्रुपची ही इलेक्ट्रिक कार भारतात मिनी कूपर एसई (Mini Cooper SE) नावाने विकली जाईल आणि कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली होती.
मिनीने पहिल्या लॉटमध्ये इलेक्ट्रिक एसईचे फक्त 30 युनिट्स ठेवले आहेत. दरम्यान, या सर्व युनिट्स लाँच होण्यापूर्वीच विकल्या गेल्या आहेत. बीएमडब्ल्यू इंडियाने आता ही कार भारतात लाँच केल्याची पुष्टी केली आहे आणि ही नवीन आणि सुंदर इलेक्ट्रिक कार मार्च 2022 मध्ये भारतात येईल. डिझाईनच्या बाबतीत मिनी नेहमीच एक शानदार कार राहिली आहे आणि तिचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट तीन-दरवाजा मॉडेलमध्ये सादर केले जाणार आहे. मिनी कूपर एसईला आडी ग्रिल, कंट्रास्ट कलरचा ORVM आणि ग्रिलवर वेगळा भाग देण्यात आला आहे.
याशिवाय, इलेक्ट्रिक कारला एलईडी डीआरएलसह सिग्नेचर गोल-आकाराचे हेडलॅम्प, नवीन 1-इंच स्क्वेअर डिझाइन अलॉय व्हील आणि एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत. 2022 मिनी कूपर एसईच्या केबिनला 8.8-इंचाची टचस्क्रीन सिस्टीम, नप्पा लेदर अपहोल्स्ट्री आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. नवीन मिनी इलेक्ट्रिक कूपरसोबत कंपनी अनेक फीचर्स देणार आहे. जे हाय-टेक असणार आहेत.
नवीन कार मिनी कूपर एसईसोबत 32.6 किलोवाट-आर बॅटरी पॅक दिला आहे. जो 181 बीएचपी पॉवर आणि 270 एनएम पीक टॉर्क बनवते. ही कार अतिशय वेगवान आहे आणि केवळ 7.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेऊ शकते, तर पूर्ण चार्ज केल्यावर 270 किमी पर्यंत धावेल, असा दावा केला जात आहे. ही इलेक्ट्रिक कार 11 किलोवाट आणि 50 किलोवाट चार्जरने चार्ज केली जाऊ शकते आणि हे दोन्ही चार्जर कारची बॅटरी 2.5 तास आणि 35 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज करू शकतात.