भन्नाट! 50 रुपयांत 1000 किमी; पुण्याच्या स्टार्टअपकडून Rompus+ ई सायकल लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 10:49 AM2021-03-14T10:49:05+5:302021-03-14T10:49:24+5:30

Nexzu Mobility Rompus+ electric cycle: भारतातील मोठी पिझ्झा कंपनी असलेल्या पापा जॉन्स पिझ्झाचे गुंतवणूकदार असलेल्या अतुल्य मित्तल यांच्या कंपनीने ही सायकल बनविली आहे. त्यांनी त्यांच्या गरजेसाठी अवान मोटर्सनावाची कंपनी स्थापन केली होती. त्याची नेक्सझू मोबिलिटी ही स्टार्टअप कंपनी आहे. 

Nexzu Mobility launches Rompus+ electric cycle at Rs 31,983; 1000 km in Just 50 Rs | भन्नाट! 50 रुपयांत 1000 किमी; पुण्याच्या स्टार्टअपकडून Rompus+ ई सायकल लाँच

भन्नाट! 50 रुपयांत 1000 किमी; पुण्याच्या स्टार्टअपकडून Rompus+ ई सायकल लाँच

googlenewsNext

पिझ्झा डिलिव्हरीसाठी एका उद्योजकाच्या कंपनीला पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर परवडत नव्हत्या म्हणून त्या उद्योजकाने ईव्ही सायकलवर (electric vehicle (EV)) संशोधन सुरु केले. यासाठी त्याने स्वत:ची स्टार्टअप कंपनी सुरु केली. आज या शोधाला मोठे यश मिळाले असून फक्त 50 रुपयांत 1000 किमीच्या रेंजच्या ई सायकल बनविल्या आहेत. ( Nexzu Mobility on Monday launched Rompus+, a 3-speed electric vehicle (EV) that can be used as a scooter or a bicycle. It is priced at INR 31,983)


पुण्यातील स्टार्टअप नेक्सझू मोबिलिटीने (Nexzu Mobility) दोन नवीन इलेक्ट्रीक सायकल बाजारात आणल्या आहेत. Rompus+ आणि Roadlark या दोन विजेवर चालणाऱ्या ई सायकल आहेत. भारतातील मोठी पिझ्झा कंपनी असलेल्या पापा जॉन्स पिझ्झाचे गुंतवणूकदार असलेल्या अतुल्य मित्तल यांच्या कंपनीने ही सायकल बनविली आहे. त्यांनी त्यांच्या गरजेसाठी अवान मोटर्सनावाची कंपनी स्थापन केली होती. त्याची नेक्सझू मोबिलिटी ही स्टार्टअप कंपनी आहे. 


Rompus+ electric cycle ची किंमत 31,983 रुपये आहे. महत्वाचे म्हणजे ही सायकल फोनसारखी चार्ज करता येणार आहे. यामध्ये 250W 36V BLDC मोटर देण्यात आली असून 5.2Ah lithium-ion battery देण्यात आली आहे. ही बॅटरी  2.5-3 तासांत फूल चार्ज होते. तसेच या बॅटरीची लाईफ सायकल ही 750 चार्जची आहे. या Rompus+ चा वेग हा 25kmph असून 18 महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. या साकलची रेंज ही  22km थ्रोटल मोडवर  आणि 35km इको पेडल मोडवर असणार आहे. 


तर Roadlark या ई सायकलची किंमत 42,317 रुपये असून ती कोरोना संकट यायच्या काही दिवस आधी लाँच करण्यात आली होती. ही सायकल तीन चे ४ तासांत फूल चार्ज होते. तसेच एका चार्जमध्ये 80 किमीची रेंज देते. थ्रोटल मोडवर  65 आणि पेडल मोडवर 55 किमी ही सायकल धावू शकते. 

कुठे मिळेल...
कंपनीने नवीन फॅक्टरी पुण्यातील चाकणमध्ये सुरु केली आहे. तिथेच Rompus+ चे उत्पादन घेतले जाणार आहे. Rompus+ electric cycle ही Blue, Red, Grey आणि Black अशा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ही ई सायकल Nexzu Mobility च्या कोणत्याही डिलरशीपकडे किंवा कंपनीच्या वेबसाईटवर बुक करता येणार आहे. Rompus+ लवकरच पेटीएम मॉल आणि अॅमेझॉनवरही उपलब्ध केली जाणार आहे. 
 

Web Title: Nexzu Mobility launches Rompus+ electric cycle at Rs 31,983; 1000 km in Just 50 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.