Nissan India Price Hike: मारूती पाठोपाठ निसानच्या कारही महागणार, १ एप्रिलपासून होणार दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 06:59 PM2021-03-23T18:59:17+5:302021-03-23T19:00:13+5:30

Maruti Suzuki India च्या निर्णयानंतर Nissan India नंदेखील कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Nissan India to increase prices of all models for Nissan and Datsun from April 1 | Nissan India Price Hike: मारूती पाठोपाठ निसानच्या कारही महागणार, १ एप्रिलपासून होणार दरवाढ

Nissan India Price Hike: मारूती पाठोपाठ निसानच्या कारही महागणार, १ एप्रिलपासून होणार दरवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी मारूती सुझुकीनंही १ एप्रिलपासून दरवाढ करण्याचा घेतला होता निर्णयऑटो पार्ट्सच्या वाढत्या किंमतीमुळे निर्णय घेतल्याची निसानची माहिती

Nissan India Price Hike: आपलं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ग्राहकांना आपला खिसा थोडा जास्त रिकामा करावा लागणार आहे. एप्रिल महिन्यापासून कंपन्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. मारूती सुझुकी इंडियानंतर आता वाहन उत्पादक कंपनी निसान देखील आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान इंडियानं मंगळवारी अन्य उत्पादनांच्या किंमती वाढल्यामुळे कारच्या किंमती वाढवल्या जाणार असल्याची माहिती दिली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२१ पासून Nissan आणि Datsun च्या सर्व गाड्यांच्या किंमती वाढवण्यात येणार आहेत. परंतु सध्या या किंमती किती वाढवल्या जातील याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही. 

ऑटो पार्ट्सच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीनं किंमती न वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु आता कंपनी सर्व Nissan आणि Datsun च्या गाड्यांच्या किंमती वाढवणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. तसंच प्रत्येक व्हेरिअंटप्रमाणे या किंमती निरनिराळ्या असतील असंही कंपनीनं स्पष्ट केलं. प्रत्येक व्हेरिअंटनुसार गाड्यांच्या किंमती वाढवल्या जात आहे. परंतु आताही भारतीय ग्राहकांना बेस्ट व्हॅल्यू प्रपोझिशन उपलब्ध करून दिलं जात आहे, अशी प्रतिक्रियाा निसान मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी दिली. 

मारूतीच्या गाड्याही महागणार

एप्रिल महिन्यात Maruti Alto पासून Maruti Brezza पर्यंत अनेक कार्स महाग होणार आहेत. या वर्षात कंपनी दुसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार आहे. यापूर्वी कंपनीनं जानेवारी महिन्यात आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या होत्या. Maruti Suzuki नं दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ निरनिराळ्या कार्सच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे. परंतु कोणत्या कारची किंमत किती वाढेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाहन क्षेत्राला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसंच मागणी कमी आणि कारसाठी आवश्यक असलेल्या अन्य उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली होती.

Web Title: Nissan India to increase prices of all models for Nissan and Datsun from April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.