भारतात बनलेली मॅग्नाईट आता जगात विकली जाणार; निस्सानने मोदींचे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:18 IST2025-02-04T12:18:32+5:302025-02-04T12:18:42+5:30
निस्सान मोटर इंडियाकडून भारतात नवीन मॅग्नाईट लाँच करण्यात आली आहे.

भारतात बनलेली मॅग्नाईट आता जगात विकली जाणार; निस्सानने मोदींचे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार केले
एकीकडे संसदेत विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया कसे फेल गेले याचे दाखले देत असताना भारतात बनलेली परदेशी कंपनीची कार जगभरात विकली जाणार आहे. निस्सान मोटर इंडियाकडून भारतात नवीन मॅग्नाईट लाँच करण्यात आली आहे. आता हीच कार लेफ्ट हँड ड्राईव्हमध्ये रुपांतरीत करून ६५ हून अधिक देशांमध्ये विकली जाणार आहे.
दरडींचा धोकादायक अणुस्कुरा घाट अन् Nissan Magnite AMT; 1200 किमींची कोकणात भ्रमंती, कशी वाटली...
जानेवारी महिन्यात निस्सानने २९०० गाड्या निर्यात केल्या आहेत. या कार लॅटिन अमेरिकेसह इतर देशांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात ७१०० युनिट राईट हँड ड्राईव्ह आणि लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेल्या ६५ देशांत पाठविल्या जाणार आहेत.
निस्सानची ही बी-एसयूव्ही आहे. ही कार चेन्नईतील प्रकल्पामध्ये उत्पादित केली जाते. या कारमध्ये ८ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, यात अॅपल कारप्ले देण्यात आलेला आहे. तसेच या कारमध्ये सहा एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), व्हेइकल डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी) आदी सुरक्षेची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. मॅग्नाईटमध्ये टर्बोचार्ज्ड १.० लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे.
लकम अॅनिमेशनसह ७ इंची टीएफटी मीटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, फुल फ्लश टचस्क्रीनसह ८ इंची इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो व बिल्ट इन व्हॉइस रेकग्निशन आदी देण्यात आले आहे. ही कार 20 किमी प्रति लिटरचे मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत. ६०-४० स्प्लिट फोल्टेबर रिअर सीटही देण्यात आली आहे.