Alto K10 पेक्षाही स्वस्त आहे ही SUV! फीचर्स 'लाजवाब' अन् तेवढीच सुरक्षितही, जाणून घ्या मायलेज अन् प्राइस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:38 AM2023-08-26T11:38:51+5:302023-08-26T11:39:36+5:30
आपल्या घरासमोर एखादी कार असावी, असे जवळपास सर्वांनाच वाटत असते. त्यातही एखादी चांगली आणि दमदार SUV असेल तर उत्तमच.
भारतीय कार बाजारात सध्या SUV कारचा जबरदस्त बोलबाला आहे. आपल्या घरासमोर एखादी कार असावी, असे जवळपास सर्वांनाच वाटत असते. त्यातही एखादी चांगली आणि दमदार SUV असेल तर उत्तमच. कारण रास्ता कितीही अवघड असला, तरी या कारमधून प्रवास सोपा होतो. मात्र सर्वच जण SUV विकत घेऊ शकत नाही. अनेक जण तर आपल्या बजेटमुळे यांचा विचारही करत नाहीत. कारण हिच्या किंमतीच जवळपास 10 लाख पासून सुरू होतात. अशातच बाजारात एक जबरदस्त SUV कार आली आहे. जी दमदारही आहे आणि बजेटमध्येही आहे.
Alto K-10 पेक्षा स्वस्त SUV -
आज आम्ही आपल्यासाठी Alto K-10 पेक्षाही स्वस्त SUV चा पर्याय घेऊन आलो आहोत. महत्वाचे म्हणजे हिचे फीचर्सदेखील जबरदस्त आहेत. एवढेच नाही, तर हिचे मायलेजही जबरदस्त आहे. तसेच परफॉर्मेंसच्या बाबतीतही, हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
निसान मॅग्नाइट -
या कारचे नाव आहे मॅग्नाइट (Nissan Magnite). आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, मॅग्नाइट आणि तीही ऑल्टोपेक्षा स्वस्त? पण हो हे खरे आहे. कारण हिच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत साधारणपणे 6 लाख रुपये एवढी आहे. तर ALTO K10 चे CNG व्हेरिअँट 7 लाख रुपयांपर्यंत जाते. महत्वाचे म्हणजे, निसान मॅग्नाइटला 4 स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळालेली आहे. अर्थात ही कार सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ठीक आहे.
मायलेज, फीचर्स आणि किंमत -
आपल्याला मॅग्नाइटमध्ये 4 व्हेरिअँट्स आणि दोन इंजिन ऑप्शन मिळतात. यात भरपूर स्पेससह इंफोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील, 2 एअरबॅग, वॉशरसह रियर डिफॉगर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओव्हीआरएम, एबीएस, ईबीड आणि रियर व फ्रंट पॉवर विंडो सारखे फीचर्स मिळतात.
मॅग्नाइटच्या मायलेज संदर्भात विचार करता, ही कार 22 किलोमीटर प्रति लीटरहूनही अधिकचे मायलेज देते. या कारमध्ये आपल्याला 1.0 लिटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. जे 71 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम एवढा टार्क जनरेट करते. तसेच दुसऱ्या इंजिन ऑप्शनमध्येही 1.0 लिटरचे टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. ही कार मॅन्युअल आणि सीव्हीटी, अशा दोन्ही प्रकारच्या गिअरबॉक्समध्ये ऑफर केले जाते.