...तर 80 लाख लोकांचा रोजगार जाईल', मंत्री असेपर्यंत भारतात अशा कार येऊ देणार नाही! गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 19:42 IST2023-12-18T19:41:36+5:302023-12-18T19:42:17+5:30
"टेस्लाचे भारतात स्वागत आहे. भारतात विक्रीसाठी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणे स्वीकार्य नाही. आम्ही टेस्लाला भारतात येण्याची परवानगी देऊ, पण त्यांना चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून भारतात विकता येणार नाही. हे शक्य नाही," असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

...तर 80 लाख लोकांचा रोजगार जाईल', मंत्री असेपर्यंत भारतात अशा कार येऊ देणार नाही! गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं
भारतात ड्रायव्हरलेस अथवा ऑटोनॉमस कार लॉन्च केल्या जाणार नाहीत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. "जोवर मी मंत्री आहे, तोवर ड्रायव्हरलेस कार भारतात लॉन्च करण्यास परवानगी दिली जाणार नाही," असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते आयआयएम नागपूरने आयोजित केलेल्या 'झिरो माईल' कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
यावेळी नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल अभियांत्रिकीतील बदलांवर भर दिला. जसे की, कारमध्ये सहा एअरबॅग्ज समावेश करणे, रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट्स कमी करे आणि मोटार वाहन कायद्याद्वारे दंड वाढविणे आदी. तसेच, "आम्ही मोटार वाहन कायद्याद्वारे दंड वाढविला आहे, रुग्णवाहिका आणि क्रेन ठेवले आहेत, जेणेकरुन येथून गोष्टी सुरळीत होतील. आम्ही दरवर्षी जनजागृती देखील करतो," असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
ड्रायव्हरलेस कार भारतात येणार नाहीत -
बिझनेस टुडेच्या एका प्रश्नावर बोलताना नितिन गडकरी म्हणाले, "मी कधीही ड्रायव्हरलेस कार भारतात येऊ देणार नाही, कारण असे झाले तर, अनेक ड्रायव्हर्सना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि मी असे होऊ देणार नाही. याच वेळी "टेस्लाचे भारतात स्वागत आहे. भारतात विक्रीसाठी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणे स्वीकार्य नाही. आम्ही टेस्लाला भारतात येण्याची परवानगी देऊ, पण त्यांना चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून भारतात विकता येणार नाही. हे शक्य नाही," असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.