आता Driving Licence आणि RC सोबत ठेवण्याची गरज नाही, या पद्धतीने कापले जाणार नाही चलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:47 PM2022-03-26T12:47:29+5:302022-03-26T12:49:17+5:30

Driving Licence : केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही.

no need to carry driving license mparivahan app vehicle rc new traffic rules | आता Driving Licence आणि RC सोबत ठेवण्याची गरज नाही, या पद्धतीने कापले जाणार नाही चलन

आता Driving Licence आणि RC सोबत ठेवण्याची गरज नाही, या पद्धतीने कापले जाणार नाही चलन

googlenewsNext

नवी दिल्ली : वाहन चालवताना तुम्ही सोबत ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) न ठेवल्याबद्दल तुमचे चलन कापले गेले असेल. कारण ही कागदपत्रे ड्रायव्हरकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र आता ही सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही.

केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही. त्याऐवजी, तुम्ही ही कागदपत्रे एमपरिवहन मोबाइल अॅपमध्ये (mParivahan mobile app) साठवू शकता. गरज पडल्यास ही कागदपत्रे एमपरिवहन मोबाइल अॅपद्वारे अधिकाऱ्यांना दाखवता येतील. हे 100 टक्के वापरकर्त्यांसाठी स्वीकार्य, प्रमाणित आणि सोयीस्कर आहे.

mParivahan mobile app मध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जोडण्यासाठी स्पेट बाय स्पेट प्रोसेस जाणून घ्या...

Step 1: सर्वात आधी  Google Play Store वरून mParivahan अॅप डाउनलोड करा.

Step 2: तुमचा मोबाईल नंबर वापरून साइन अप करा. तुम्हाला एक OTP मिळेल. अॅपवर एंटर करा आणि रजिस्टर करा.

Step 3: आता, तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत - DL (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकिट).

Step 4: तुमचा DL नंबर एंटर करा.

Step 5: व्हर्च्युअल DL साठी  "Add to My Dashboard" वर क्लिक करा.

Step 6: जन्मतारीख एंटर करा आणि तुमचा DL तुमच्या डॅशबोर्डवर जोडला जाईल.

अशाप्रकारे करा वापर
स्क्रीनच्या टॉपवर तुमचा व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्ड बटणावर क्लिक करा, एकदा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, तुमचा DL तपशील आणि एक QR कोड दिसेल. हा कोड कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी अधिकारी वापरतात. तुम्ही अॅपमध्ये तुमच्या वाहनांचे आरसी बुक तपशील देखील जोडू शकता.

अनेक वाहने जोडू शकता
mParivahan अॅपवर, व्यक्ती किंवा व्यक्तीद्वारे वापरलेली अनेक वाहने जोडता येतात. उदाहरणार्थ, पत्नीने नोंदणी केलेले वाहन चालवणारा पती त्याच्या अॅपवर वाहन तपशील देखील जोडू शकतो. त्याचप्रमाणे, ड्रायव्हिंग लायसन्सचे तपशील अनेक मोबाइल डिव्हाइसवर जोडले जाऊ शकतात.

Web Title: no need to carry driving license mparivahan app vehicle rc new traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.