अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 02:39 PM2024-09-25T14:39:44+5:302024-09-25T14:41:25+5:30

अनेकांना आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर असावा वाटतो, पण असा नंबर सहजासहजी मिळत नाही.

Not Ambani or Adani, but 'these' Indians have the most expensive car number plates; Look at the price | अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत...

अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत...

Top 5 Most Expensive Number Plates : जगभरात अनेकजण आहेत, जे महागड्या गाड्या वापरण्यासोबतच आपल्या गाड्यांसाठी अनोखी/व्हीआयपी नंबर प्लेट घेतात. भारतातदेखील अनेकांकडे व्हीआयपी नंबरप्लेट असलेल्या गाड्या आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, देशातील सर्वात महागड्या नंबर प्लेट वापरणाऱ्यांमध्ये अदानी-अंबानी यांचे नावे नाहीत. 

भारतातील सर्वात महागड्या नंबर प्लेट्स आणि त्यांचे मालक

आशिक पटेल  (Toyota Fortuner - ‘007’)
भारतातील सर्वात महाग नंबर प्लेट आशिक पटेल यांच्या टोयोटा फॉर्च्युनरवर आहे. या गाडीचा नंबर '007' असून, या नंबर प्लेटची किंमत 34 लाख रुपये आहे. हा आकडा जेम्स बाँडच्या चित्रपटांवरुन प्रेरित आहे, ज्यामुळे या नंबरची किंमत जास्त आहे.

के. एस. बालगोपाल (Porche 718 Boxster - ‘KL-01-CK-1’)
दुसऱ्या क्रमांकावर के. एस. बालगोपाल यांचे नाव आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांपैकी एक असलेली Porche 718 Boxster आहे. या गाडीचा नंबर ‘KL-01-CK-1’ मिळवण्यासाठी त्यांनी 31 लाख रुपये मोजले आहेत. 

के. एस. बालगोपाल (Toyota Land Cruiser LC200 - ‘KL01CB0001’)
के. एस. बालगोपाल यांच्याकडे  आणखी एक कार आहे, जिचा नंबरदेखील महागड्या नंबर प्लेटच्या यादीत येतो. त्यांच्याकडे Toyota Land Cruiser LC200 आहे, ज्याचा नंबर  ‘KL01CB0001’ असून त्याची किंमत 18 लाख रुपये आहे.

जगजित सिंग (Toyota Land Cruiser LC200 - ‘CH01AN0001’)
जगजीत सिंग यांच्याकडे असलेल्या टोयोटा लँड क्रूझर LC200 साठी त्यांनी 17 लाख रुपयांचा 'CH01AN0001' नंबर मिळवला आहे.

राहुल तनेजा (Jaguar XJL - ‘RJ45CG0001’)
राहुल तनेजा यांच्याकडे Jaguar XJL असून, त्या गाडीची नंबर प्लेट 'RJ45CG0001' आहे. यासाठी त्यांनी 16 लाख रुपये मोजले आहेत.

मुकेश अंबानी
आपण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कारच्या नंबर प्लेटबद्दल बोललो, तर त्यांच्या BMW 7-Series च्या नंबर प्लेटची किंमत 9 लाख रुपये आहे. हा नंबर “MH 01 AK 0001” आहे. 2022 मध्ये अंबानी यांनी एक रोल्स रॉयस खरेदी केली, ज्याचा नंबर '0001' आहे. यासाठी त्यांनी 12 लाख रुपये मोजले. 

Web Title: Not Ambani or Adani, but 'these' Indians have the most expensive car number plates; Look at the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.