Superfast EV Charging: तासंतास नाही! पेट्रोल, डिझेल भरण्याएवढाच वेळ लागणार; भन्नाट स्पीडने इलेक्ट्रीक कार चार्ज होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:56 AM2022-05-30T10:56:29+5:302022-05-30T10:57:00+5:30
सध्यातरी ईव्ही या पहिल्या पसंतीच्या कार किंवा स्कूटर नाहीएत. यामध्ये सर्वात मोठी मर्यादा ही चार्जिंगची आहे आणि कमी रेंजची आहे. चार्ज करायला तीन -चार तास लागतात आणि रेंज एवढी कमी असते की एक दिवसाआड तर चार्ज करावीच लागते.
सध्या ईलेक्ट्रीक वाहने दोन-चार तास चार्ज करत उभी ठेवावी लागतात. एवढा वेळ जर एका वाहनासाठी लागत असेल तर जेव्हा या वाहनांची संख्या वाढेल तेव्हा चार्जिंग स्टेशनवर रांगाच रांगा लागतील आणि वेटिंग पिरिएड हा काही दिवसांचा असेल. ही आजची परिस्थिती आहे, परंतू तेवढ्या कार किंवा स्कूटर रस्त्यावर नाहीत. यामुळे दिसत नाहीय. परंतू येणारा काळ एवढा फास्ट चार्जिंगचा असेल की पेट्रोल, डिझेल भरायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ईव्ही चार्ज करण्यास लागणार आहे.
हुवाई या कंपनीने एक दिलासा देणारी घोषणा केली आहे. चीनची ही कंपनी अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्याद्वारे २०० किमीची रेंजसाठी उपयुक्त चार्जिंग तुम्हाला ५ मिनिटांत मिळेल. परंतू हे सर्वच गाड्यांना उपयोगी नसेल तर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या तेव्हाच्या कारना असणार आहे.
सध्यातरी ईव्ही या पहिल्या पसंतीच्या कार किंवा स्कूटर नाहीएत. यामध्ये सर्वात मोठी मर्यादा ही चार्जिंगची आहे आणि कमी रेंजची आहे. चार्ज करायला तीन -चार तास लागतात आणि रेंज एवढी कमी असते की एक दिवसाआड तर चार्ज करावीच लागते. Huawei चा हा प्रयोग यशस्वी झाला तर ईलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती येणार आहे.
२०२१ मध्ये कंपनीने चीनमध्ये स्मार्ट ड्रायव्हिंग सोल्यूशन वन लाँच केले होते. याद्वारे ईलेक्ट्रीक वाहने १० मिनिटे चार्ज केल्यावर ती २०० किमीची रेंज देत आहेत. हे एक स्मार्ट आयओटी इंटिग्रेशन आहे, जे हार्मनी ओएस नॅव्हिगेशनवर काम करते, असे कंपनीचे अधिकारी वांग चाओ यांनी सांगितले आहे.