टाटाच नाही, इंडियन आर्मीचा आणखी एक भारतीय कंपनीवर विश्वास; दिली 1,850 कारची ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:08 PM2023-07-13T18:08:22+5:302023-07-13T18:08:36+5:30
महिंद्राला आर्मीकडून जानेवारीमध्ये 1,470 यूनिटची ऑर्डर मिळाली होती. ती पूर्ण करताच नवीन ऑर्डर मिळाली आहे.
महिंद्रा भारतीय सैन्यासाठी स्कॉर्पिओ ही एसयुव्ही तयार करत आहे. इंडियन आर्मीकडून महिंद्राला 1,850 यूनिट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. स्कॉर्पिओ क्लासिकच्या आर्मीच्या खाकी हिरव्या रंगातील फोटो कंपनीने पोस्ट केले आहेत. यामध्ये स्क़ॉर्पिओचे जुने मॉडेल दाखविण्य़ात आले आहे.
महिंद्राला आर्मीकडून जानेवारीमध्ये 1,470 यूनिटची ऑर्डर मिळाली होती. ती पूर्ण करताच नवीन ऑर्डर मिळाली आहे. आर्मीसाठी महिंद्रा डिझेलच्या कार पुरविण्याची शक्यता आहे. आर्मी टाटाची स्टॉर्म सफारी देखील वापरते. महिंद्राच्या या कारमध्ये जुना लोगो दिसत आहे. जुने ग्रिल आणि अलॉय व्हिल्स दिसत आहेत. ही कार सामान्य नागरिकांसाठी 2.2-लीटर एमहॉक इंजिनमध्ये मिळत होती. 132 पीएस ची ताकद आणि 300 एनएमचा पीक टॉर्क देते.
महिंद्राने सशस्त्र दलांना पुरवल्या जाणार्या मॉडेलचे कोणतेही वैशिष्ट्य समोर आणलेले नाहीय. परंतू, या कारला अधिक शक्तीशाली बनविण्यात येणार आहे. 140 PS पॉवर आणि 320 Nm टॉर्क तयार करणे अपेक्षित आहे. तसेच केवळ पुढील चाकाला नव्हे तर चारही चाकांना ताकद म्हणजेच 4X4 असण्याची शक्यता आहे.
कंपनी आता ही SUV भारतात दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये ऑफर करते, त्यात Scorpio-N आणि Scorpio Classic यांचा समावेश आहे. स्कॉर्पिओ-एन ही अधिक आधुनिक आणि वैशिष्ट्यांनी भरलेली एसयूव्ही आहे. परंतू, स्कॉर्पिओ क्लासिकने आपला स्टान्स कायम ठेवला आहे. भारतीय लष्कराकडून याला पसंती देण्याचे हेही प्रमुख कारण आहे.