केवळ Activa चं नाही, या चार स्कूटर्सचीही होतोय तुफान विक्री! किंमत ६८,६२५ पासून पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:10 PM2023-02-24T21:10:08+5:302023-02-24T21:10:55+5:30
भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच मागणी असते. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये स्कूटरना त्यांच्या विशेष उपयुक्ततेमुळे जास्त मागणी आहे.
भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच मागणी असते. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये स्कूटरना त्यांच्या विशेष उपयुक्ततेमुळे जास्त मागणी आहे. घर ते ऑफिस किंवा नियमित शहरातील प्रवासासाठी आणि अगदी शॉपिंगसाठीही स्कूटर हे वाहतुकीचे सर्वात सोयीचे साधन मानले जाते. या सेगमेंटमध्ये होंडाच्या अॅक्टिव्हाची तोड नाही, ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. अलीकडेच कंपनीने नवीन ॲडव्हान्स्ड फीचर्ससह Activa Smart लाँच केली आहे. पण Honda Activa व्यतिरिक्त, इतर अनेक मॉडेल्स आहेत ज्यांची विक्री चांगली होते. चला तर मग पाहूया त्या स्कूटर्स-
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) शेअर केलेल्या अलीकडील डेटानुसार, जानेवारी 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप 5 स्कूटरच्या यादीनुसार देशातील इलेक्ट्रीक स्कूटर्स ICE इंजिनद्वारे चालणाऱ्या पारपारिक स्कूटर्सची डिमांड कमी झाली आहे. तथापि, इतर स्कूटरबद्दल बोलण्याआधी, हे जाणून घ्या की, गेल्या जानेवारीमध्ये, Honda ने त्याच्या प्रसिद्ध स्कूटर Activa चे एकूण 1,30,001 युनिट्स विकले आहेत. जे मागील वर्षी याच महिन्यात 1,43,234 युनिट होते.
जानेवारी महिन्यात होडा ॲक्टिव्हाच्या 1,30,001, टिव्हीएस ज्युपिटरच्या 54,484 युनिट्सची विक्री झाली होती. तर दुसरीकडे सुझुकी ॲक्सेसच्या 45,497, टीव्हीस एनटॉर्क 24,362, होंडा डिओच्या 18,752 युनिट्सची विक्री झाली. टीव्हीएस ज्युपिटरची सुरूवातीची किंमत 69,990 रुपये आहे. तर ज्युपिटर 125 ची किंमत 82,825 रुपये आहे. सुझुकी ॲक्सेस 125 ची किंमत 77,900 रुपये आहे, तर टीव्हीएस एन टॉर्क 125 ची किंमत 78,506 रुपये आहे. तर दुसरीकडे होंडा डिओची सुरुवातीची किंमत 68,625 रुपये आहे.