कारमधील एअरकंडिशनर आता बनली काळाची अपरिहार्य गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:55 AM2017-08-23T11:55:42+5:302017-08-23T18:04:20+5:30

कारमध्ये वातानुकूल चांगले असले पाहिजे अशी आजची हवामानाची स्थिती असते. विशेष करून शहरात एअरकंडिशनर ही कारमधील गरज बनली आहे.

now air conditioner is essential in car | कारमधील एअरकंडिशनर आता बनली काळाची अपरिहार्य गरज

कारमधील एअरकंडिशनर आता बनली काळाची अपरिहार्य गरज

Next
ठळक मुद्देशहरातील धुरकांड्यामध्ये प्रवास करणेही त्रासदायक होते. यासाठी एअरकंडिशन असणे हे गरजेचे झाले आहे.वातानुकुलीत यंत्रणा ही १९३३ मध्ये अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात प्रथम अस्तित्त्वात आणली गेलीवातानुकुलीत यंत्रणेचा लाभ घेताना योग्यरितीने घ्यावा व त्यामुळे पैशाचा अनावश्यक व्यय टाळावा

भारतीय बाजारपेठेत सध्या बहुतांश मोटार उत्पादक कंपन्या आपल्या मोटारी अधिक खपाव्यात यासाठी अंतर्गत सौंदर्य वाढविण्यासाठीच मोटारीला ग्राहकांसमोर त्या रूपात मांडत असतात. या सुविधेचा एक भाग म्हणजे एअर कंडिशनर. वातानुकूलन यंत्रणा. कारमध्ये आता एअरकंडिशन अपरिहार्य झाले आहे. त्याशिवाय कारमध्ये आरामदायी व विशेष करून शहरातील धुरकांड्यामध्ये प्रवास करणेही त्रासदायक होते. यासाठी एअरकंडिशन असणे हे गरजेचे झाले आहे.
वातानुकुलीत यंत्रणा ही १९३३ मध्ये अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात प्रथम अस्तित्त्वात आणली गेली. आरामदायी व अलिशान अशा मोटारींच्या ग्राहकांसाठी ही यंत्रणा उपलब्ध केली. उत्तरोत्तर ही यंत्रणा- व्यस्था विकसित होत गेली. आज मोटारीत वातानुकुलीत यंत्रणा ही सर्वांनाच आवश्यक झाली आहे.
वातानुकूलीत यंत्रणेमुळे मोटारीतील वायुवीजन नीट तर राहाते, त्याचा फायदा व आराम प्रवासात जाणवतो. पण त्याचबरोबर त्यामुळे मोटारीच्या इंधन वापरावरही मोठा परिणाम होत असतो. ही यंत्रणा कशी वापरावी यालाही तंत्र असते ते लक्षात घेणे गरजेचे आहे.
वातानुकुलीत यंत्रणेतून मोटारीत दिला जाणारा थंडगार वाऱ्याचा शिडकावा चालकाच्या पुढील डॅशबोर्डला असलेल्या छोटेखानी झरोक्यातून येत असतो. आता हे झरोके मागील आसनस्थ लोकांनाही काही मोटारींमध्ये देण्यात येतात. साधारणपणे डॅशबोर्डमध्ये असणारे हे झरोके छोटेखानी हॅचबॅकला वा मध्यम सेदान मोटारीला पुरेसे आहेत मात्र मोठ्या मोटारींमध्ये मागील आसनांवरील प्रवाशांनाही या शीतलतेचा लाभ व्हावा म्हणून छताकडील बाजूने किंवा दरवाजाच्या अंतर्गत भागातून वा मध्यभागातून झरोके देण्यात आले आहेत. अर्थात सर्व मोटारींना ही सोय नसते. वातानुकुलीत यंत्रणेबरोबरच हीटरही देण्यात येतो. या हीटरमुळे अति थंडीमध्ये छान उबदारपणा मोटारीतील प्रवाशांना मिळतो. वातानुकुलीत यंत्रणा ही आजच्या मोटारींमधील शान बनली आहे. अर्थात त्यामुळे इंधन वापर अधिक होत असतो. तो टाळण्यासाठी चढावावर मोटार जात असताना, सिग्नलला मोटार उभी असताना वातानुकुलीत यंत्रणा बंद ठेवणे उत्तम. चढावावर वातानुकुलीत यंत्रणा चालू असेल तर इंजिनावर अधिक ताण येत असतो. मोटार चालू केल्यानंतर ही यंत्रणा मग चालू करावी. प्रथम कमी मापकावर व नंतर आवश्यक वा मध्यम मापकावर वाऱ्याचा झोत स्थिर करावा. उन्हामध्ये मोटार असेल व आत गरम वातावरण असेल तर प्रथम आतील अतिगरमपणा कमी होऊन द्यावा त्यासाठी खिडक्या काही काळ उघडून मग वातानुकुलीत यंत्रणा चालू करावी. त्यानंतर काचा बंद करून घ्याव्यात म्हणजे थंडपणा चांगला तयार होईल.एकंदरीत या वातानुकुलीत यंत्रणेमुळे इंधन वापरावर होणारा ताण पाहाता आता काही काळानी थर्मल सिस्टिम इंटिग्रेशन फॉर फ्युएल इकॉनॉमी हे (टीआयएफएफई) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. लवकरच ते मोटारींमध्ये बसविलेही जाईल. पण तोपर्यंत वातानुकुलीत यंत्रणेचा लाभ घेताना योग्यरितीने घ्यावा व त्यामुळे पैशाचा अनावश्यक व्यय टाळावा इतकेच.

 

Web Title: now air conditioner is essential in car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.