आता 7-8 Seater कार विसरा, या कंपनीनं आणली 10 सीटर कार! लुक असा की विसरून जाल Gurkha-Thar

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:48 PM2023-02-22T14:48:44+5:302023-02-22T14:49:17+5:30

आम्ही आपल्याला सांगितले की, बाजारात एक नवी 10 सीटर कार आली आहे, तर कदाचित आपण 7 अथवा 8 सीटर कारला विसरून जाल.

Now forget about 7-8 seater cars this company has brought a 10 seater car A look that will make you forget Gurkha-Thar know about the price and features | आता 7-8 Seater कार विसरा, या कंपनीनं आणली 10 सीटर कार! लुक असा की विसरून जाल Gurkha-Thar

आता 7-8 Seater कार विसरा, या कंपनीनं आणली 10 सीटर कार! लुक असा की विसरून जाल Gurkha-Thar

googlenewsNext

देशात 7 आणि 8 सीटर कारला जबरदस्त मागणी आहे. या कारचा फायदा असा की, यात आपण मोठे कुटुंब तर बसवू शकताच, शिवाय आपण हिचा व्यावसायाच्या दृष्टीनेही वापर करू शकता. मारुतीपासून ते महिंद्रा आणि टोयोटापर्यंत, या सेगमेंटमध्ये कारची विक्री करतात. पण, आम्ही आपल्याला सांगितले की, बाजारात एक नवी 10 सीटर कार आली आहे, तर कदाचित आपण 7 अथवा 8 सीटर कारला विसरून जाल. खरे तर, इंडियन ऑटो मेकर ब्रँड फोर्स मोटर्स (Force Motors) भारतात सिटीलाईन नावाने एक 10 सीटर कार विकते. जाणून घ्या सविस्तर...

फोर्स सिटीलाईनचे वैशिष्ट्य म्हणजे, यात ड्रायव्हरशिवाय 9 लोक बसू शकतात. कारमधील सर्व सीट फ्रंट फेसिंग आहेत. सर्वसाधारणपणे 7 सीटर कारमध्ये 3 रांगा असतात. तसेच, फोर्स सिटीलाईनमध्ये सिट्ससाठी 4 रांगा देण्यात आल्या आहेत. येथे पहिल्या रांगेत 2 लोक, दुसऱ्या रांगेत 3 लोक, तिसऱ्या रांगेत 2 लोक आणि चौथ्या मध्ये 3 लोक बसू शकतात. या गाडीची किंमत 17.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे.

इंजिन संदर्भात बोलायचे झाल्यास, या गाडीला 2596cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 90hp आणि 250hp एवढा टॉर्क जेनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय, यात सर्वांसाठी सेगमेंटमध्ये छान लेगरूम, हेडरूम, एल्बोरूम आणि शोल्डर रूमही मिळते.

फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास यात लॉक होणारा ग्लवज बॉक्स, 4 एसी व्हेंट्स आणि मॅन्युअल AC कंट्रोल्स देण्यात आले आहे. चार्जिंगसाठी 12 व्होल्टचे पॉवर सॉकेट आणि पॉवर स्टिअरिंग देण्यात आले आहे. यात 4 पॉवर विंडोज मिळतात. याचे कंट्रोल सेंटर कंसोलमध्ये देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, 2nd row मध्येही 4 एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. जे छतामध्ये बसवलेले आहेत.

Web Title: Now forget about 7-8 seater cars this company has brought a 10 seater car A look that will make you forget Gurkha-Thar know about the price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.