आता 'फ्लाइंग कार'ही आणतेय Maruti Suzuki, घराच्या छतावरून करता येणार 'टेकऑफ' अन् 'लँडिंग'!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 06:41 PM2024-02-12T18:41:38+5:302024-02-12T18:42:46+5:30
Maruti Electric Air Copter: महत्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आता जमिनीवर चालणाऱ्या कार बरोबरच, हवेत उडणाऱ्या कार बनवण्याच्याही तयारीत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मारुती सुझुकी आपली पॅरेंट कंपनी असलेल्या सुझुकीच्या सोबतीने इलेक्ट्रिक एअर कॉप्टर (Air Copters) बनवण्याच्या तयारीत आहे. कंपनी सुरुवातीला ही कार जपान आणि अमेरिकेसारख्या बाजारात लॉन्च करेल, यानंतर तीला भारतीय बाजारातही उतरवले जाऊ शकते.
TOI च्या वृत्तानुसार, मारुती सुझुकीने पॅरेंट कंपनी असलेल्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसोबत यासाठी भागीदारी केली असून, या अंतर्गत हवेत उडणारे इलेक्ट्रिक कॉप्टर्स तयार केले जातील. हे एअर कॉप्टर्स ड्रोनपेक्षाही मोठे असतील, मात्र सामान्य हेलिकॉप्टरच्या तुलनेत लहान असतील. यात पायलटसह किमान 3 जणांसाठी बसण्याची व्यवस्था असेल, असे बोलले जात आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, कंपनी या एअर कॉप्टरला सर्वप्रथम जपान आणि अमेरिकेच्या बाजारात एअर टॅक्सी म्हणून लॉन्च करणार आहे. यानंतर त्या भारतीय बाजारातही आणण्याची योजना आहे. महत्वाचे म्हणजे, भातीय बाजारात केवळ लॉन्च करण्याचाच नव्हे, तर या एअर कॉप्टरची किंमत किमान ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासंदर्भातही कंपनी विचार करत आहे.
केव्हा होणार लॉन्च? -
यासंदर्भात बोलताना सुझुकी मोटरचे सहाय्यक व्यवस्थापक केंटो ओगुरा म्हणाले की, ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी विमान वाहतूक नियामकसोबत (DGCA) चर्चा सुरू आहे. स्कायड्राइव्ह नावाचे इलेक्ट्रिक एअर कॉप्टर जपानमधील 2025 ओसाका एक्सपोमध्ये लॉन्च करणे अपेक्षित आहे. महत्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे.
हेलिकॉप्टरच्या तुलनेत कसे वेगळी असेल Maruti चे कॉप्टर? -
उड्डाण करताना एअर कॉप्टरचे वजन 1.4 टन एवढे असेल. हे वजन पारंपरिक हेलीकॉप्टरच्या वजनापेक्षा जवळपास अर्धे असेल. तसेच माध्यमांतील वृत्तांनुसार, इलेक्ट्रिफिकेशनमुळे, या एअर कॉप्टरच्या कंपोनेंट्समध्ये बरीच घट झाली आहे. परिणामी, याचे मॅन्युफॅक्चरिंग आणि मेन्टनन्स कॉस्ट दोन्हीही कमी असतील.