आता हवेत चालवा माेटारसायकल, जगातील पहिल्या फ्लाइंग बाइकची बुकिंग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 10:58 AM2023-01-05T10:58:30+5:302023-01-05T10:59:56+5:30
माेटरसायकलची चाचणी सुरू असून, अमेरिकेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनी ८ जेट इंजिन असलेली बाईक बाजारात आणू शकते.
लाॅस अँजेलिस : हवेत उडणारी जगातील पहिली माेटरसायकल लाॅंच करण्यात आली असून, त्यासाठी बुकिंगही सुरू झाली आहे.
अमेरिकेतील जेटपॅक एव्हिएशन कंपनीने ही माेटरसायकल बनवली आहे. चाचणीसाठी बनविलेल्या या माेटरसायकलमध्ये ४ टरबाईन्स हाेते. मात्र, अंतिम उत्पादनात ८ टरबाईन्स राहणार आहेत. माेटरसायकलची चाचणी सुरू असून, अमेरिकेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनी ८ जेट इंजिन असलेली बाईक बाजारात आणू शकते. (वृत्तसंस्था)
उडणाऱ्या बाइकचे नाव आहे ‘स्पीडर’
ही माेटरसायकल म्हणजे एक प्रकारची एअर युटिलिटी व्हेईकल आहे. वैद्यकीय आणीबाणी, आग विझविणे आदी कामांसाठी तिचा वापर करता येईल. कंपनी लष्करासाठी कार्गाे व्हर्जनही बनवत असून, ते ताशी ४०० किमी वेगाने जमिनीच्या १०० फूट उंचीवरून उडविता येईल.
३.१५ काेटी
किंमत एवढी आहे.
१३६ किलाे वजन
२७२ किलाे
भारवहन क्षमता
९६ किमी ताशी वेग
३० मिनिटे राहू
शकते हवेत
रिमाेटद्वारे वापर शक्य