RTO Services: आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:22 AM2022-12-14T08:22:09+5:302022-12-14T08:22:24+5:30

केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे. 

Now the vehicle will be 'transferred' while sitting at home; RTO's 14 services 'faceless' | RTO Services: आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’ 

RTO Services: आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’ 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ पद्धतीने ‘आरटीओ’च्या १२ सेवा दिल्या जात होत्या. आता आणखी दोन सेवांची भर पडली. त्यात घरी बसूनच वाहन हस्तांतरण (ट्रान्सफर) आणि तात्पुरती नोंदणीही करता येईल. केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे. 

काय सुविधा? 
‘लर्निंग लायसन्स’ परीक्षा, डुप्लिकेट आरसी, डुप्लिकेट लायसन्स, लायसन्स नूतनीकरण, एनओसी, आरसी किंवा लायसन्सवरील पत्ता बदल, कंडक्टर लायसन्सचे नूतनीकरण, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहन हस्तांतरण, परमिट हस्तांतरण, विशेष परमिटसाठी अर्ज, परिवहन सेवेतील रेकॉर्डमध्ये मोबाइलचा नंबर नोंदविणे, कर्जबोजा रद्द करण्यासह आता वाहन ट्रान्सफर व तात्पुरती नोंदणी सेवेचा समावेश.

असा करा अर्ज 
वाहन विकणाऱ्यांनी व वाहन विकत घेणाऱ्यांनी ‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावरून वाहन हस्तांतरणाकरिता आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज करावा. 
वाहन व चेसीस क्रमांकाचे छायाचित्र ओळखपत्रासह अपलोड करावे. 
अर्ज पूर्ण केल्यानंतर नमुना २९ ची एक प्रत मूळ नोंदणी प्राधिकरणास ई-मेलद्वारे प्राप्त होईल. 
अर्जदारास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. प्राप्त अर्ज छाननी करून दोन दिवसांच्या आत निकाली निघेल.

तात्पुरत्या नोंदणीसाठी हे करा
n ‘फेसलेस’सेवेच्या मदतीने तात्पुरती नोंदणी ही सेवा परिवहन संवर्गातील वाहन वैयक्तिक नावावर नोंदणी करावयाचे असलेल्या अर्जदारांसाठी सुरू करण्यात येत आहे. 
n वाहन वितरकांनी ‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावरून वाहनाचे तात्पुरती नोंदणी अर्जाचे एन्ट्री व व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रे अपलोड करा.
n वाहन वितरकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.  अर्जामध्ये त्रुटी असल्यास ‘आरटीओ’ कार्यालय वाहन वितरकास माहिती देईल.

कर्ज नसलेल्या वाहनांचेच होणार हस्तांतरण 
‘फेसलेस’मधील वाहन हस्तांतरण ही सेवा कर्जबोजा नसलेल्या वाहनांसाठी असणार आहे. याशिवाय, खासगी संवर्गातील वाहने व वैयक्तिक नावावर वाहन असलेल्या अर्जदारांकरिता राहणार आहे. 
 

Web Title: Now the vehicle will be 'transferred' while sitting at home; RTO's 14 services 'faceless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.