आता चोरीचं टेन्शन नाही, Honda नं लॉन्च केली नवी Activa; खास फिचर्स मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 01:25 PM2023-01-22T13:25:29+5:302023-01-22T13:25:46+5:30
एकदा बाजारात आल्यावर ही Activa स्कूटर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी TVS ज्युपिटरला टक्कर देईल.
मुंबई - होंडा मोटारसायकल एँन्ड स्कूटर इंडिया (HMSI) उद्या सोमवार, २३ जानेवारी रोजी नवीन मॉडेल लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. त्यांचे नवीन उत्पादन नवीन एडवांस फिचर्ससह सुसज्ज असेल असं कंपनीने नुकतेच जाहीर केले. हे Activa चे नवीन अपडेटेड मॉडेल असू शकते. Activa हे कंपनीच्या पोर्टफोलिओचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे आणि कंपनीने २०२० च्या सुरुवातीला हे बाजारात आणलं होते. तेव्हापासून या स्कूटरला कोणतेही नवीन अपडेट मिळालेले नाहीत. कंपनी एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह नवीन अॅक्टिव्हा बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे.
होंडाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये जो टिझर होता त्यात कंपनी आपल्या नवीन उत्पादनामध्ये एच-स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करेल. कंपनी त्याचे नाव Activa H-Smart ठेवण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या स्कूटरबद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. उद्या एका कार्यक्रमात होंडा अधिकृतपणे ही स्कूटर लॉन्च करणार आहे.
रिपोर्टनुसार, होंडा या स्कूटरमध्ये त्यांच्या एच-स्मार्ट तंत्रज्ञानाचा भाग म्हणून नवीन अँटी-थेफ्ट सिस्टमसह अनेक नवीन फिचर्स समाविष्ट करू शकतात. एकदा बाजारात आल्यावर ही Activa स्कूटर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी TVS ज्युपिटरला टक्कर देईल. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत या स्कूटरचे वजन थोडे कमी असू शकते, याशिवाय बॉडीवर एच-स्मार्ट ग्राफिक्स इत्यादी देखील दिसू शकतात.
Witness the Launch of Hondas Latest Innovation https://t.co/bhaiHM0m81
— Honda 2 Wheelers (@honda2wheelerin) January 21, 2023
Activa H-Smart मध्ये एंटी थेफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे एक अतिशय उपयुक्त फिचर आहे. सामान्यतः जेव्हा स्कूटर लॉक स्थितीत असते म्हणजे कुठेतरी पार्क केलेली असते तेथे कंपन, चाक फिरणे, पॉवर ऑन किंवा इंजिन सुरू होते, तेव्हा ही सिस्टिम तात्काळ अलार्म वाजते आणि मोटर लॉक करते. यामुळे तुम्ही सतर्क तर होताच, शिवाय चोर वाहन घेऊन पळून जाऊ शकत नाही.
कंपनी या स्कूटरच्या इंजिन मेकॅनिझममध्ये काही बदल देखील करू शकते. हे शक्य आहे की नवीन इंजिन अधिक शक्तिशाली असेल.
स्कूटर 110cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड युनिट वापरेल जे 7.80 Bhp पॉवर जनरेट करेल, तर सध्याचे मॉडेल 7.68 Bhp पॉवर निर्माण करते. कंपनी त्यांच्या वाहनांमध्ये होंडा इग्निशन सिक्युरिटी सिस्टम (HISS) वापरत आहे. आता नवीन H-Smart पर्यंत स्कूटरची श्रेणी आणखी प्रीमियम बनवेल. अॅक्टिव्हा हे कंपनीने सादर केलेले पहिले मॉडेल असेल, ज्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल. नवीन फीचर अपडेटनंतर स्कूटरची किंमत थोडी वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या Honda Activa 6G ची किंमत ७३,१७६ ते ७६,६७७ रुपये आहे.