'या' स्वस्त Electric Bike ची डिलिव्हरी सुरू, 187KM पर्यंत रेंज; पाहा फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:47 PM2023-07-11T15:47:45+5:302023-07-11T15:57:30+5:30
Oben Rorr: या बाईकची बॅटरी फक्त दोन तासात फुल चार्ज होते.
Oben Rorr Electric Bike: ओबेन इलेक्ट्रिक (Oben Electric) ने आपली इलेक्ट्रिक बाईक- ओबेन रोअरची डिलिव्हरी सुरू केली आहे. सर्वात आधी बंगळुरुमध्ये 25 युनिट्सची डिलिव्हरी झाली. कंपनीने ग्राहकांना त्यांच्या जिगानी, बंगळुरू येथे असलेल्या फॅक्टरीत बोलवून बाईकची डिलिव्हरी दिली. या बाईकची किंमत 1.5 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. बाजारात या बाईकची स्पर्धा Tork Kratos R आणि Revolt RV400 सोबत असेल.
ओबेन रोअर फुल चार्जवर 187KM ची रेंज देते. तसेच, ही बाईक 3 सेकंदात 0-40 किमीचा वेग पकडण्यास सक्षम आहे. बाईकची टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीने यात 4.4kWh बॅटरी आणि 8KW इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. याची बॅटरी दोन तासात फुल चार्ज होते. कंपनीने या बाईकसोबत पहिल्या वर्षी 3 फ्री सर्व्हिस दिल्या आहेत. 50,000 किमी किंवा 3 वर्षांची वॉरंटीदेखील मिळते. ही वॉरंटी 5 वर्षे किंवा 75,000 किमीपर्यंत वाढवता येते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ओबेन रोअरच्या विक्रीला चालना देणार्या प्रमुख गोष्टींमध्ये 150 सीसी पेट्रोल मोटरसायकलपेक्षा चांगली कामगिरी, नवीन डिझाइन आणि स्मार्ट फीचर्सचा समावेश आहे. एकूण 21,000 प्री-ऑर्डरसह कंपनी सक्रियपणे त्यांच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहे. तसेच प्रत्येक शहर आणि राज्यामध्ये शोरुम आणि सर्व्हिस स्टेशन उघडण्याची योजना आहे.