सिंगल चार्जमध्ये 200 किमीपर्यंत रेंज, Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:47 PM2022-03-15T17:47:48+5:302022-03-15T17:48:23+5:30
Oben Rorr electric motorcycle launched in India : कंपनीने आज देशातील आपले पहिले ईव्ही प्रोडक्ट ओबेन रोर (Oben Rorr) लाँच केले.
नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक स्टार्टअप कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने देशात लॉन्च करत आहेत. देशात आधीपासून असलेल्या ईव्ही स्टार्टअप्सच्या लांबलचक यादीत सामील होणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओबेन ही बेंगळुरू-आधारित स्टार्टअप आहे. कंपनीने आज देशातील आपले पहिले ईव्ही प्रोडक्ट ओबेन रोर (Oben Rorr) लाँच केले.
या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ओबेन ही प्रिमियम बॅटरी-इलेक्ट्रिक मोटरसायकल देशात लॉन्च करणाऱ्या काही कंपन्यांपैकी एक बनली आहे. Oben Rorr सध्या भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे, परंतु डिलिव्हरी जुलै 2022 मध्ये सुरू होईल तर टेस्ट राइड मे 2022 मध्ये सुरू होईल.
फीचर आणि रेंज
Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक मोठ्या टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह येते, जी वेग, बॅटरी चार्ज स्थिती, उर्वरित राइडिंग रेंज आणि बरेच काही तसेच सर्व आवश्यक रीडआउट देते. ईव्हीमध्ये ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम, चोरीचे संरक्षण, नेव्हिगेशन, टेलिफोनी, वाहन डायग्नोस्टिक्स, जवळचे चार्जिंग स्टेशन शोधणे यासारखे कनेक्ट केलेले तंत्रज्ञान यासारख्या सुविधांसह सुसज्ज आहे. याशिवाय, परफॉर्मन्स आणि रेंज देण्यासाठी, इलेक्ट्रिक बाईकला तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत, ज्यात हवॉक, सीटी आणि इको मोडचा समावेश आहे. ही बाईक हवॉक मोडमध्ये 100 किमी, सीटी मोडमध्ये 120 किमी आणि इको मोडमध्ये 150 किमीची रेंज देईल.
बॅटरी पॅक
Oben Rorr मध्ये 4.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 13.4 bhp पॉवर आणि 62 Nm पीक टॉर्क जनरेट करते. टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकचा टॉप स्पीड 100 किमी/तास आहे आणि ही ई-बाईक तीन सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग पकडते. कंपनीचा दावा आहे की Oben Rorr सिंगल चार्जवर 200 किमी पर्यंत प्रवास करू शकते. दरम्यान, कंपनी बंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक्स सिटीजवळ आपला प्लांट उभारत आहे आणि मागणीनुसार, प्लांटची क्षमता वार्षिक 3 लाख युनिट्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.