175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 03:07 PM2024-11-18T15:07:03+5:302024-11-18T15:07:40+5:30
ही बाईक एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच, या बाईकमध्ये तुम्हाला इतर फिचर्स सुद्धा मिळतील.
नवी दिल्ली : दररोज वापर करण्यासाठी ज्या लोकांना बाईक हवी आहे आणि पेट्रोलचा सु्द्धा खर्च टाळायचा आहे. अशा लोकांसासाठी Oben Electric Rorr EZ ही इलेक्ट्रिक बाईक एक चांगला पर्याय ठरू शकते. ही बाईक एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच, या बाईकमध्ये तुम्हाला इतर फिचर्स सुद्धा मिळतील.
ओबेनच्या दाव्यानुसार, बाईकचे टॉप मॉडेल एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. याचबरोबर, बाईकच्या लोअर व्हेरिएंटची रेंज यापेक्षा किंचित कमी असू शकते. ही बाईक पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही, एकदा चार्ज केल्यानंतर ती जास्त काळ टिकेल.
बाईकचा टॉप स्पीड 95 किलोमीटर प्रति तास आहे. ही बाईक 3.3 सेकंदात 0-40 किमी प्रतितास चालवता येते. इतकेच नाही तर या बाईकमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळत आहे. या बाईकची बॅटरी 45 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
फीचर्स आणि कलर ऑप्शन
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये तुम्हाला 3 राइडिंग मोड मिळत आहेत. यामुळे राइडची गुणवत्ता सुधारते आणि तुमचा राइडिंगचा अनुभव चांगला होतो. तुम्हाला ही बाईक 4 कलर ऑप्शनमध्ये मिळत आहे, ज्यामधून तुम्ही तुमचा आवडता रंग निवडू शकता. यामध्ये इलेक्ट्रो अंबर, सर्ज सायन, ल्युमिना ग्रीन आणि फोटॉन व्हाइट कलरचा समावेश आहे.ही बाईक ARX फ्रेमवर्कवर तयार करण्यात आली असून बाईकचे डिझाइन निओ-क्लासिक आहे. तरुणांना ही बाईक खूप आवडते. सध्याचा ट्रेंड आणि मागणी लक्षात घेऊन असा बाईकचा लूक तयार करण्यात आला आहे.
किंमत किती?
इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये विविध व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच, बाईकच्या 2.6 kWh व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एक्स-शोरूम किंमत 89,999 रुपये आहे. तर या बाईकच्या 3.4 kWh व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे आणि 4.4 kWh व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,09,999 रुपये आहे.