अरे चालवणार कुठे? यंदा सुमारे ९ कोटी वाहने विकली जाणार; प्रदुषण तरी कसे घटणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:48 PM2024-01-01T13:48:59+5:302024-01-01T13:55:03+5:30

शहरातली वाहतूक कोंडी काय असते हे त्या पाच-सहा दिवसांत तिथल्या लोकांनीही पाहिले असेल.

Oh where to drive, park? About 9 crore vehicles will be sold this year; How will the pollution be reduced... | अरे चालवणार कुठे? यंदा सुमारे ९ कोटी वाहने विकली जाणार; प्रदुषण तरी कसे घटणार...

अरे चालवणार कुठे? यंदा सुमारे ९ कोटी वाहने विकली जाणार; प्रदुषण तरी कसे घटणार...

नवीन वर्ष नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. अनेकांनी काही ना काही तरी मनाशी ठरविलेच असेल. नववर्षाच्या स्वागतासाठी नाताळ सणाच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने वाहने पर्यटन स्थळांकडे गेली होती. शहरातली वाहतूक कोंडी काय असते हे त्या पाच-सहा दिवसांत तिथल्या लोकांनीही पाहिले असेल. असे असताना येते वर्ष वाहतुकीच्या प्रश्नावरून पोटात गोळा येऊ शकेल अशी आकडेवारी आणत आहे. 

नव्या वर्षात थोडी थोडकी नव्हे तर जगभरात ८.८ कोटी वाहने विकली जाण्याचा अंदाज आहे. एसअँडपी ग्लोबल मोबिलिटीच्या अंदाजानुसार यंदा वाहनांच्या विक्रीमध्ये २.८ टक्क्यांची वाढ होणार आहे. 

जागतिक बाजारात हलक्या वाहनांच्या विक्रीतील वाढीची गती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. परंतू, ग्राहकांना वाढत्या किंमती, कर्जावरील वाढते व्याज आणि वाढते इंधन याची चिंता सतावू शकते त्याचा परिणाम वाहन विक्रीवर होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. पश्चिमी/मध्य यूरोपीय बाजारात 14.7 दशलक्ष वाहने विक्रीचा अंदाज आहे. यामध्ये वार्षिक १२.८ टक्के वाढ कायम राहणार आहे. 

2024 कडे पाहता, S&P ग्लोबल मोबिलिटीने 15.1 दशलक्ष युनिट्सचा अंदाज लावला आहे. आर्थिक मंदीचा धोका, कर्जाच्या कडक अटी आणि घटते इलेक्ट्रिक वाहन (EV) सबसिडी यासारखे घटक आव्हाने निर्माण करू शकतात. 2023 च्या 15.5 दशलक्ष युनिट्सच्या अंदाजित पातळीपेक्षा 2.0 टक्के वाढ दर्शवते. 2024 मध्ये बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची जागतिक विक्री 13.3 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. 
 

Web Title: Oh where to drive, park? About 9 crore vehicles will be sold this year; How will the pollution be reduced...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन