Okaya Faast F2F : कमी किंमत...बेस्ट ड्रायव्हिंग रेंज! लॉन्च झाली जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर, किंमत ऐकून खरेदी करण्याचं करेल मन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:35 AM2023-02-21T11:35:38+5:302023-02-21T11:36:36+5:30

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Okaya नं आज स्थानिक बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लॉन्चिंगची घोषणा केली आहे.

okaya ev launches faast f2f electric scooter with 80km range price at inr | Okaya Faast F2F : कमी किंमत...बेस्ट ड्रायव्हिंग रेंज! लॉन्च झाली जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर, किंमत ऐकून खरेदी करण्याचं करेल मन

Okaya Faast F2F : कमी किंमत...बेस्ट ड्रायव्हिंग रेंज! लॉन्च झाली जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर, किंमत ऐकून खरेदी करण्याचं करेल मन

googlenewsNext

नवी दिल्ली-

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Okaya नं आज स्थानिक बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लॉन्चिंगची घोषणा केली आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार या स्कूटरची निर्मिती खासकरुन सिटी राइड आणि दैनंदिन वापराच्या दृष्टीकोनातून केली गेली आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी पॅकनं सज्ज असलेल्या या इलेक्ट्रीक स्कूटरची सुरुवातीची किंमत ८३,९९९ रुपये (एक्स-शो रुम) इतकी निश्चित केली गेली आहे.

कशी आहे Okaya Faast F2F: 
ओकायाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 800W-BLDC हब मोटारचा वापर केला आहे. ज्यात 60V36Ah (2.2kWh) लिथियम आयर्न-LFP बॅटरी देण्यात आळी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार स्कूटरची बॅटरी हाय सेफ्टी स्टँडर्डवर आधारित आहे. बॅटरीवर २ वर्षांची वॉरंटी देखील देण्यात येत आहे. 

उच्च क्षमतेची एलएफपी बॅटरी- 
दीर्घकाळ चालणाऱ्या लिथियम-आयर्न एलएफपी बॅटरीचा उपयोग यात केला गेला आहे. ही बॅटरी लाँग लाइफ आणि उच्च तापमानातही उत्तम कामगिरी करते असा दावा कंपनीनं केला आहे. बॅटरीवर २ वर्षांची किंवा २० हजार किमी वॉरंटी देखील दिली गेली आहे. 

उत्तम ड्रायव्हिंग अनुभव-
कंपनीच्या दाव्यानुसार नवी Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर जास्तीत जास्त ५५ किमी प्रतितास इतकी स्पीड देण्यास सक्षम आहे. यासाठी इलेक्ट्रीक-स्कूटर सिटी राइडसाठी उत्तम आहे. जिथं खूप ट्राफिक असतं. इतकंच नव्हे, तर १० इंचाचे ट्युबलेस टायर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉक एब्जॉर्बर देण्यात आला आहे. 

बॅटरी चार्जिंग-
ऑन द गो जनरेशनसाठी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 60V क्षमतेची 36Ah (2.2kWh) लिथियम आयन-LFP बॅटरीचा वापर केला आहे. ज्यात 800W क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलं गेलं आहे. या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ ४ ते ५ तास लागतात. यात तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे. इको, सिटी आणि स्पोर्ट्स मोड्सचा यात समावेश आहे.  

Web Title: okaya ev launches faast f2f electric scooter with 80km range price at inr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.