Ola, Ather अन् TVS... 'या' कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:09 PM2024-10-17T13:09:47+5:302024-10-17T13:10:43+5:30
Electric Scooter Battery Warranty : इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वात महाग पार्ट म्हणजे बॅटरी.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooters) मार्केटमध्ये मागणी झपाट्याने वाढत आहे. जर तुम्हीही या सणासुदीच्या हंगामात नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर पहिल्यांदा स्कूटरच्या बॅटरीशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वात महाग पार्ट म्हणजे बॅटरी.
दरम्यान, मार्केटमध्ये Ola, Ather आणि TVS सारख्या बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांना चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देत आहेत. अशा परिस्थितीत बॅटरी जितकी सुरक्षित आणि अधिक शक्तिशाली असेल तितकी चांगली ड्रायव्हिंग रेंज तुम्हाला स्कूटरसोबत मिळेल. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्यापूर्वी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, तुम्ही खरेदी करत असलेल्या स्कूटरमध्ये दिलेल्या बॅटरीची वॉरंटी काय आहे?
जाणून घ्या बॅटरीच्या वॉरंटीबद्दल?
ओला स्कूटर (Ola Scooter): जर तुम्ही ओला इलेक्ट्रिककडून नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला कंपनीकडून 8 वर्षे/80,000 किमी पर्यंतच्या वॉरंटीचा लाभ मिळेल.
अॅथर स्कूटर (Ather Scooter) : अॅथर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षे/30,000 किमी पर्यंतची वॉरंटी देते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही Ather Battery Protect Plan स्वतंत्रपणे खरेदी करू शकता आणि बॅटरीची वॉरंटी 5 वर्षे/60,000 किमी पर्यंत वाढवू शकता.
टीव्हीएस स्कूटर (TVS Scooter): टीव्हीएस कंपनीकडे इलेक्ट्रिक स्कूटर देखील आहे, जी कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. या स्कूटरचे नाव TVS iQube आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 वर्षे/50,000 किमी पर्यंतच्या वॉरंटीसह येते. स्कूटर खरेदी करताना तुम्ही एक्सटेंडेड वॉरंटी घेतल्यास, तुम्हाला 5 वर्षे/70,000 किमी पर्यंत बॅटरी वॉरंटीचा लाभ मिळेल.
हे लक्षात असू द्या...
दरम्यान, तुम्ही इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शोरूममधील सेल्स एक्झिक्युटिव्हकडून बॅटरीच्या वॉरंटीती सविस्तर माहिती नक्कीच जाणून घ्या. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहनांसह विशेषत: एक्सटेंडेड वॉरंटीबद्दल विचारा जेणेकरून तुमच्या बॅटरीची वॉरंटी पुढील काही वर्षांपर्यंत वाढेल.