भाविष अग्रवाल-कुणाल कामराचा वाद वाढला; थेट नितीन गडकरींकडे केली कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:29 PM2024-10-28T19:29:01+5:302024-10-28T19:29:42+5:30

Bhavish Aggarwal Ola Electric: ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविष अग्रवाल आणि कुणाल कामरामधील वाद वाढला आहे.

Ola Electric: Bhavish Agarwal and Kunal Kamra's dispute escalates; Demanded action directly from Nitin Gadkari | भाविष अग्रवाल-कुणाल कामराचा वाद वाढला; थेट नितीन गडकरींकडे केली कारवाईची मागणी

भाविष अग्रवाल-कुणाल कामराचा वाद वाढला; थेट नितीन गडकरींकडे केली कारवाईची मागणी

Bhavish Aggarwal:ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric) सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) आणि कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्यात सुरू झालेले वाकयुद्ध अजूनही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता. पण, नंतर हा वाद निवळला असे वाटत असताना, आता पुन्हा एकदा कुणाल कामराने भाविश अग्रवाल आणि ओला इलेक्ट्रिकवर निशाणा साधला आहे. ओला स्कूटर्सचा मुद्दा उपस्थित करत कामराने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

ओलाचा दावा- 99 टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निराकरण केले
कुणाल कामराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ग्राहक ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर नाराज आहेत. त्यांची समस्या कुठेही ऐकून घेतली जात नाही. ओलाकडून कोणतीही पारदर्शकता ठेवली जात नाही. कर्ज घेऊन ओला स्कूटर खरेदी करणाऱ्यांना आता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कंपनी आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा आरोप कुणाल कामरा यांनी केला आहे. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला माहिती दिली होती की त्यांनी 99.1 टक्के ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण केले आहे.

भाविष-कुणाल यांच्यात काय आहे वाद?
काही दिवसांपूर्वीच कुणाल कामराने एक्सवर पोस्ट शेअर करत ओलाची आफ्टर सेल सर्व्हिस खराब असल्याचे म्हटले होते. आपल्या पोस्टमध्ये त्याने ओला शोरुमबाहेर लावलेल्या शेकडो ओला स्कूटर दाखवल्या होत्या. या पोस्टवर भाविष अग्रवाल यांनी टीका केली, त्यावर परत कुणाल कामराने प्रत्युत्तर दिले. हा वाद पुढे वाढत गेला. दरम्यान, सीसीपीए ओलाविरोधात चौकशी करत आहे. कंपनीविरोधात 10 हजारांहून अधिक तक्रारी आल्यानंतर नोटीसही बजावण्यात आली.

Web Title: Ola Electric: Bhavish Agarwal and Kunal Kamra's dispute escalates; Demanded action directly from Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.