इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! ऑर्डर दिल्यानंतर २-३ दिवसात स्कूटर देणार ही कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 09:54 AM2022-11-07T09:54:21+5:302022-11-07T09:57:37+5:30
गेल्या काही दिवसापासून इंधनाची दरवाढ सुरुच आहे. यामुळे आता इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वेटींग करावी लागत आहे.
गेल्या काही दिवसापासून इंधनाची दरवाढ सुरुच आहे. यामुळे आता इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वेटींग करावी लागत आहे. ओला (Ola) कंपनीने मागील वर्षी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली.आता ओला आपल्या ग्राहकांना दोन ते तीन दिवसात इलेक्ट्रिक स्कूटर पोहोचवणार आहे. त्यामुळे आता ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर खेरदी करणाऱ्यांना दोन ते तीन दिवसात स्कूटर मिळणार आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करुन ही घोषणा केली.
पुढच्या आठवड्यापासून संपूर्ण देशातील ओलाच्या सेंटरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना त्याच दिवशी किंवा दोन ते तीन दिवसात मिळणार आहे. ग्राहकांना स्कूटर ऑनलाईनही ऑर्डर करता येणार आहे.
महिलांना गुंतवणूक करायची असेल तर 'या' योजना ठरतील फायदेशीर! मिळेल चांगला परतावा
ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करुन एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून S1 आणि S1 Pro स्कूटर बाजारात आली. Ola सध्या S1 इलेक्ट्रिक स्कूटर ९९,९९९ रुपयांना आणि S1 Pro १,३९,९९९ रुपयांना विकते. सध्या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल S1 Air लाँच केले आहे. याची किंमत ८४,९९९ आहे. ही कंपनीची सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
पुढील वर्षी ग्राहक ९९९ रुपयांमध्ये Ola S1 Air बुक करू शकतात. याचे एप्रिलपासून वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. या वर्षी जानेवारीपर्यंत सुमारे ७०,००० स्कूटरांची विक्री झाली आहे.