५ मिनिटांमध्ये Electric Scooter होणार फुल चार्च; तंत्रज्ञानासाठी OLA ची 'या' कंपनीशी हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:19 PM2022-03-23T16:19:53+5:302022-03-23T16:22:20+5:30
भारतातील आघाडीची इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रीकने (OLA Electric) इस्त्रायली बॅटरी तंत्रज्ञान कंपनी स्टोअरडॉटमध्ये गुंतवणूक केली आहे.
भारतातील आघाडीची इलेक्ट्रीक वाहन उत्पादन कंपनी ओला इलेक्ट्रीकने (OLA Electric) इस्त्रायली बॅटरी तंत्रज्ञान कंपनी Storedot मध्ये गुंतवणूक केली आहे. फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या बॅटरीचं उत्पादन करण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. स्टारडॉटमधील गुंतवणूक जागतिक रणनितीक गुंतवणूकीतील पहिली गुंतवणूक असल्याचं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनाद्वारे सांगितलं.
स्टारडॉट अतिजलद चार्जिंग '५ मिनिट चार्ज' ईव्ही बॅटरी तंत्रज्ञान आणणार आहे. तसंच काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची योजना आहे. कंपनीने येत्या १० वर्षांत व्यापारीकरणासाठी '२-मिनिट चार्ज' तंत्रज्ञानावर काम करण्याची योजना आखली आहे. कंपनीने यासाठी कामही सुरू केलं आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कंपनीच्या स्कूटर्स अधिक जलद गतीनं चार्ज होतील. एक्सएफसी बॅटरी तंत्रज्ञान केवळ ५ मिनिटांमध्ये स्कूटर ० ते १०० टक्के इतकी चार्ज होणार आहे.
याबाबत कंपनीनं अधिक माहिती दिलेली नाही. या गुंतवणूकीनंतर ओलाकडे भारतात स्टोरडॉटच्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान बनवण्याचा अधिकार असे. तसंच हे तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरेल हे येत्या काळातच समजेल. भारतात ईव्हीएससाठी चांगली बाजारपेठ तयार करणं हा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच आम्ही अत्याधुनिक काम करणाऱ्या जागतिक कंपन्यांसोबत करार करत आहोत, अशी माहिती ओलाचं संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली.