Ola Electric : ओला स्कूटर्सवर मिळतेय मोठी सवलत, 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना मिळणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:36 PM2022-12-17T22:36:56+5:302022-12-17T22:37:27+5:30
Ola Discount Offers : या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एस वन प्रोवर 10,000 रुपयांच्या सवलतीसह 4,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आणि एस वन वर 2,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
नवी दिल्ली : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एस वन प्रोवर 10,000 रुपयांच्या सवलतीसह 4,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आणि एस वन वर 2,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
ओलाची ही सवलत 10,000 रुपयांसाठी 31 डिसेंबरपर्यंत वैध आहे, तर 4,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर 18 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत वैध आहे. सध्या एस वन प्रो आणि एस वनची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 1,25,000 रुपये आणि 97,999 रुपये आहे. ही स्कूटर शून्य डाऊन पेमेंटवर ईएमआयद्वारे देखील खरेदी केली जाऊ शकते.
लवकर मिळेल मूव्ह ओएस 3
कंपनी लवकरच आपल्या ग्राहकांना आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी मूव्ह ओएस 3 अपडेट जारी करेल. यात हिल होल्ड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लेव्हल, साउंडट्रॅक इत्यादी अॅडेड फीचर्स मिळतीत.
ओला एस वन प्रोचा बॅटरी पॅक
ओला एस वन प्रो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.5kW चा बॅटरी पॅक मिळतो, जो 181 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 116 किमी/तास आहे. ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 40 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते.
काय आहेत फीचर्स?
ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स सारखे राइडिंग मोड्स मिळतात. इको मोडवर 125 किमी, नॉर्मल मोडवर 100 किमी आणि स्पोर्ट्स मोडवर 90 किमीची रेंज देते. यासोबतच यामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सही मिळतात.
टीव्हीएस आयक्यूबशी स्पर्धा
ओला एस वन टीव्हीएस आयक्यूबशी स्पर्धा करते. यामध्ये 4.4kW इलेक्ट्रिक हब मोटर मिळते, जी 3kW पॉवर आणि 140Nm पीक टॉर्क निर्माण करते. त्याचा टॉप स्पीड 78 किमी प्रतितास आहे.